Bottles seized from a company manufacturing packaged drinking water. esakal
नाशिक

Nashik Crime News : घोटी येथील ड्रिंकिंग वॉटर निर्मिती कंपनीवर छापा; साडेचार लाखाचा माल जप्त

घोटी (ता. इगतपुरी) येथील पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरची निर्मिती करणाऱ्या कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई करत एकूण चार लाख २६ हजार ४८८ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : घोटी (ता. इगतपुरी) येथील पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरची निर्मिती करणाऱ्या कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई करत एकूण चार लाख २६ हजार ४८८ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

सहाय्यक आयुक्त (अन्न) सी. लोहकरे, गो.वि.कासार यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. (Raid on drinking water manufacturing company in Ghoti nashik crime news)

घोटी येथे साईमेवा फुड अॅण्ड बेव्हरजेस नावाची पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरची निर्मिती कंपनी आहे. पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरची निर्मिती ही विना बीआयएस प्रमाणपत्र तसेच आक्षेपार्ह लेबल असल्याची माहिती अन्न व औषध विभागास मिळाली.

त्यानुसार सहाय्यक आयुक्त (अन्न) सी. लोहकरे, गो.वि.कासार यांच्यासह पथकाने याठिकाणी छापा टाकत मालाची तपासणी केली असता पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरची निर्मिती ही विना बीआयएस प्रमाणपत्र तसेच आक्षेपार्ह लेबल असल्याचे आढळून आले.

असुरक्षित पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर असल्याने विभागाने पाण्याचे नमुने ताब्यात घेत प्रयोगशाळेत पाठविले. यावेळी पथकाने याठिकाणाहून पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या एकुण २१ हजार ३२४ पॅक बॉटल्स, छापलेले लेबल, २६ रोल्स असा साठा जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष; प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

T20 WC, IND vs ZIM: भारतीय संघ २ बदलांसह उतरणार; झिम्बाब्वेविरुद्धच्या Playing XI मध्ये स्टार खेळाडू परतले, कोणाचा पत्ता झाला कट ?

Indian Railways Digital Initiative : भारतीय रेल्वेने उचललं मोठं डिजिटल पाऊल!, ‘रेल टेक पोर्टल’ अन् ‘ई-आरसीटी’ प्रणाली सुरू

Latest Marathi News Live Update : वाढत्या तापमानाचा धुळ्यातील जलसाठ्यांवर परिणाम; पाणी पातळीत घट

India GDP: महत्त्वाची बातमी! १० वर्षांचा नियम संपला; देशाच्या महसूल गणनेत मोठा बदल, नवे सूत्र कधीपासून लागू होणार?

SCROLL FOR NEXT