crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : थर्टी-फस्टच्या पूर्वसंध्येला शहरात अवैध मद्यविक्रीवर छापे

सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागताच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालय हद्दीमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागताच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालय हद्दीमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

तसेच अवैध मद्यविक्रीवर करडी नजर असतानाही नाशिकरोड पोलिसांनी हद्दीमध्ये अवैधरित्या देशीदारू विक्रेत्यांविरोधात छापे टाकून गुन्हे दाखल केले आहेत. तसेच मोठ्यात देशीदारुचा साठाही जप्त केला आहे.(raids on illegal liquor shop hotel in city nashik crime news)

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. तसेच, शहरात कोठेही अवैधरित्या मद्यविक्री होऊ नये, यासाठी शहरभर पोलिस ठाणेनिहाय ऑलआऊट ऑपरेशनही राबविले जात आहे. असे असतानाही नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैधरित्या देशी दारुची विक्री सुरू असल्याचे समजताच पोलिसांनी सहा ठिकाणी छापेमारी करीत देशीदारूचा साठा जप्त केला आहे.

देवळाली गावातील मालधक्का रोडवरील पत्र्याच्या शेडमध्ये संशयित वाल्मिक काळू खैरनार (५५, रा. रमाबाई आंबेडकरनगर, माल धक्कारोड, देवळालीगाव) हा प्रिन्स संत्रा देशी दारुचा साठा बाळगताना आढळून आला. त्याच्याकडून १ हजार ७५० रुपयांचा सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. चेहडी बु. येथील एकलव्यनगरमध्ये शेडच्या आडोशाला संशयित किशोर अशोक जाधव (३३, रा. भिल्ल गल्ली, चेहडी बु.) याच्या ताब्यात १ हजार ६८० रुपयांच्या प्रिन्स संत्रा देशी दारुच्या बादल्या जप्त करण्यात आल्या.

तसेच, शिंदेगावातील सर्व्हिस रोडलगत असलेल्या हॉटेल गावरानच्या शेडच्या आडोशाला शशिकांत रमाजी पाटोळे (४४, रा. सोमाईनगर, पळसे) याच्या ताब्यातून ३ हजार ४३० रुपयांचा देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. एकलहरे रोडवरील ट्रॅक्शन गेटजवळ पत्र्याच्या शेडच्या आडोशाला रघुनाथ मंजेबा वाळके (५०, रा. एकलहरा रोड) याच्या ताब्यात १ हजार ६१० रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

नाशिकरोडच्या गोरेवाडीत डायमंड रोहाऊसजवळ संतोष शंकर साळवे (४५, रा. डायमंड रोहाऊसजवळ, शांतीनगर, गोरेवाडी) याच्या ताब्यातून १ हजार ४५० रुपयांच्या देशीदारुच्या बाटल्या जप्त केल्या. तर जेलरोडच्या पवारवाडीत अखिलेश दिलीप वाघ (३३, रा. पवारवाडी, जेलरोड) याच्या ताब्यात १ हजार ७८५ रुपयांची देशीदारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. सदरची कारवाई शनिवारी (ता.३०) सायंकाळी करण्यात आल्या असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT