Iron railing missing from Makhmalabad Naka to Peth Phata road bifurcation. esakal
नाशिक

Nashik News : मखमलाबाद नाका ते पेठ फाटा रस्त्यावरील रेलिंग गायब

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक महानगरपालिकेच्या तिजोरीतून नगरसेवक दरवर्षी लाखो रुपये रस्ते दुभाजक, दुरुस्ती आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली खर्च करत असतात.

पण ते टिकविण्याची जबाबदारी मात्र कोणीही स्वीकारत नाही हे वास्तव चित्र सध्या शहरातील अनेक भागात दिसून येत असून मखमलाबाद नाका ते पेठ फाटा या रस्त्यावरील रेलिंग अक्षरशः गायब झाले आहेत. (Railing missing from Makhmalabad Naka to Peth Fata road Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रभाग पाच मध्ये मखमलाबाद नाका ते पेठ फाटा परिसरातील पेठकर प्लाझा इमारत समोरील रस्त्याच्या दुभाजकातील जवळपास दोनशे ते तीनशे फुटाचे लोखंडी जाळ्या चोरीला गेल्याचे दिसत आहे.

तशीच परिस्थिती पेठरोड भागातील लोखंडी दुभाजकांमधील असून काही ठिकाणी संपूर्ण जाळ्या तर काही ठिकाणी जाळ्यांमधील लोखंडी पाइप चोरी गेल्याचे पाहायला मिळत आहे. या चोरी गेलेल्या जाळ्यांमुळे परिसराची शोभा बाधित होते आहे.

मात्र या जाळ्या चोरीला कशा गेल्या, कधी चोरीला गेल्या याचे कोणतेही सोयरे सुतक हे ना प्रभागातील लोकप्रतिनिधींना आहे ना मनपा प्रशासनाला. अजून मनपाकडून एकही शासकीय मालमत्तेची वस्तू चोरीला गेल्याबाबत पोलिसांत तक्रार किंवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : संसदरत्न पुरस्काराने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT