Railway gate esakal
नाशिक

Nashik Railway Gate : नाशिक, इगतपुरी तालुक्यांत 13 ठिकाणी होणार रेल्वे गेट

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक आणि इगतपुरी या दोन तालुक्यांत तेरा ठिकाणी रेल्वे गेट उभारणीची कामे प्रलंबित आहेत. परिणामी, नागरिकांचा खोळंबा होत असल्याने रेल्वे गेटसाठी लागणाऱ्या जागा, जमिनींचे तातडीने हस्तांतरप्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

नाशिक, इगतपुरी या दोन तालुक्यांत तेरा ठिकाणी रेल्वे गेट उभारणीचा विषय प्रलंबित आहे. विषय मार्गी लावण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी गंगाथरन डी., निवासी जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार राजेंद्र नजन, अनिल दौंडे, परमेश्वर कासुळे आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दोन्ही तालुक्यांत माणिकखांब, घोटी, जानोरी, नांदूरवैद्य, वंजारवाडी, लोहशिंगवे, भगूर, संसरी, बेलगाव, मालधक्का, गोरेवाडी, शिलापूर आणि ओढा अशा १३ ठिकाणी रेल्वे गेट नसल्याने लोहमार्ग ओलांडताना स्थानिक रहिवासी आणि वाहनधारकांची मोठी गैरसोय होते. रेल्वे गेट परिसरात अनेकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.

गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी रेल्वे गेट उभारणीचा प्रस्ताव आहे. तो प्रलंबित असल्याने स्थानिक रहिवासी आणि वाहनधारक त्रस्त आहेत. या विषयाच्या सातत्याने तक्रारी माझ्याकडे येत असतात. नागरिक आणि वाहनधारकांची या त्रासातून सुटका करण्यासाठी रेल्वे गेट लवकरात लवकर उभारण्यासाठी लागणाऱ्या जागा, जमिनी तातडीने हस्तांतरणाला गती देण्याच्या सूचना खासदार गोडसे यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT