Kasara Ghat 
नाशिक

निसर्ग सौंदर्याने बहरला रेल्वे कसारा घाट

पोपट गवांदे

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : दरवर्षी पावसाळ्यात मुंबई- नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाटात दरडी कोसळण्याची मालिका सुरूच आहे. याबरोबरच मध्य रेल्वेची मुख्य वाहतूक कसारा घाटातूनच होत असते. रेल्वे लाईनवर यंदा एकाच महिन्यात दोनदा दरडी कोसळल्या, मात्र रेल्वेतून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाला या घाटातून जाताना फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. रेल्वेचे बोगदे व रेल्वे पूल पाहण्यासाठी अनेक प्रवासी आपला मोबाईल खिडकीत घेऊन बसलेले दिसून येतात. (Railway Kasara Ghat is full of natural beauty)


निसर्गाने जतन करून ठेवलेले कसारा ते इगतपुरी दरम्यान सुमारे १७ किलोमीटर अंतराचा या घाटात रेल्वे अनेक बोगदे आहेत. जाताना- येताना पावसाळ्यात पाण्याचे धबधबे, खोल दरी, उंच डोंगरदऱ्या व हिरवळीने नटलेले डोंगर जणू स्वर्गाच्या जवळपास असल्याचा भास प्रत्येक प्रवाशाला होते. तसेच, मुख्य आकर्षण म्हणजे हिवाळी ब्रिज आहे. या पुलावरून रेल्वे जाताना आपण आकाशात तर तरंगत नाही ना, असा भास प्रत्येक प्रवासी अनुभवतो.

इगतपुरी ते कसारा रेल्वेचे तीन रेल्वे लाईन आहेत. प्रत्येक बोगदा पार करताना पावसाळ्यात पाण्याचे मोठ- मोठे धबधबे पहावयास मिळतात. हाच अनुभव मुंबई- नाशिक महामार्गावरील कसारा घाटातही पाहण्यास मिळतो. शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात मुंबईचे पर्यटक भावली धरण, वैतरणा धरण, इगतपुरी शहर परिसरात धबधबे पाहण्यासाठी येतात, तर अनेक पर्यटक घाटातच गाडी थांबवून धबधब्याचे फोटो काढण्याच्या नादात असतात. मात्र, यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


(Railway Kasara Ghat is full of natural beauty)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT