railway
railway esakal
नाशिक

Nashik : मालधक्क्यामुळे रेल्वेच्या महसुलात होणार वाढ

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वे (Railway) मालधक्का येथे दळणवळणामुळे रेल्वेच्या महसुलात (Revenue) छप्पर फाडके वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रवाशांप्रमाणेच माल वाहतुकीसाठी रेल्वेने स्वतंत्र लाईन टाकण्याचे काम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर योजनेतंर्गत देशभरात सुरू केले आहे. हे काम जळगावपर्यंत झाले असून, भुसावळ- नांदगाव दरम्यान प्रगतिपथावर आहे. नाशिक रोडला स्वतंत्र लाईन होणार आहे, मात्र सध्या गहू, तांदूळ, सिमेंट, भाजीपाला, चारचाकी गाड्या यांच्यासह आता नवनवीन वस्तूंची वाहतूक मालधक्क्यावर होणार असल्यामुळे रेल्वेच्या महसुलात छप्पर फाडके वाढ होणार आहे. (Railway revenue will increase due to freight Nashik News)

ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या तब्बल ३२ एकरावर पसरलेला हा मालधक्का वर्षाला कोट्यवधीचा महसूल रेल्वे मिळवून देतो. लाखो नाशिककरांना गहू, तांदूळ पुरवतो. हजारो शेतकऱ्यांना खते, बांधकामासाठी सिमेंट, उद्योगांना स्टील पुरवतो. दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, हरियानावरून येथे गहू, तांदळाच्या वर्षाला ४० मालगाड्या येतात. नंतर हा गहू, तांदूळ लाखो गरिबांना रेशनिंगवर दिला जातो. आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रातून येथे वर्षाला सिमेंटच्या ३२५ मालगाड्या येतात. गोवा, तेलंगण, गुजरात, मुंबईहून वर्षाला येथे ७० मालगाड्या खते येतात. त्यातून जिल्ह्यातील शेतकरी जगवला जातो. कृषी अर्थव्यवस्थेला उभारी मिळते. झारखंड, ओरिसा येथून वर्षाला ५० मालगाड्या स्टील येते. दररोज दोन मालगाड्या कोळसा येऊन एकलहरेचा वीज प्रकल्प चालतो. किसान ट्रेन ऑक्सिजन टँकर स्थलांतरित करण्यात माल धक्क्याचा मोठा हातभार आहे.

आता उत्तराखंडहून टाटाची वाहने रेल्वेने येऊ लागल्यामुळे कंपनीच्या खर्चात बचत होऊन ग्राहकांना थेट फायदा मिळणार आहे. नासाका सुरू झाल्याने इतरत्र साखर पाठविण्याचे तर सिन्नरचा वीज प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्याला दररोज पाच मालगाड्या कोळसा पुरविण्याचे नियोजन रेल्वे करत आहे. म्हणून रेल्वेच्या महसूल आता वाढ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. नाशिक साखर कारखाना बरोबरच एकलहरे विद्युत प्रकल्प सिन्नरचा वीज प्रकल्प त्याचप्रमाणे ऑटोमोबाईल क्षेत्रात कंपन्यांची होणाऱ्या करारामुळे मालधक्क्याच्या माध्यमातून रेल्वेच्या महसुलात चांगली कमाई होणार असल्याची चिन्हे दिसत आहे.

गरिबांसाठी रोजगाराच्या सुवर्णसंधी
नाशिक रोड मालधक्क्यामुळे हजारोंचे गावच वसले असून त्याची अर्थ, समाजव्यवस्था, येथील उद्योग- व्यवसाय मालधक्क्यामुळे सुस्थितीत आहे. येथे पाचशे माथाडी कामगार असून त्यांना दिवसाला ४०० ते ८०० रुपये रोजगार मिळतो. रेल्वेने आलेला माल ट्रकमध्ये भरल्यानंतर तो नियोजित स्थळी पोचविण्यासाठी असंख्य ट्रकचालक, किन्नर, हमाल लागतात. याद्वारे तीनशे जणांना रोजगार मिळाला आहे. येथे तीन कार्टिंग एजंट असून त्यांच्याकडे मिळून ८० कर्मचारी, ३५ सफाई कामगार आहेत. येथे दहा सुरक्षा रक्षक आहेत. मालधक्क्यामुळे पंचक्रोशीतील वसाहत, शाळा, छोटे व्यावसायिक यांची हजारो कुटुंब अवलंबून आहेत. दळणवळणाच्या माध्यमातून नव्या वस्तूंचे आदान-प्रदान होत असल्यामुळे गरिबांना मुबलक रोजगार उपलब्ध होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

दहावी-बारावीनंतरच करा स्पर्धा परीक्षेची तयारी

युरोपचे अवघडलेपण

SCROLL FOR NEXT