Rain Damage paddy farming esakal
नाशिक

खाण्यापुरते तरी उत्पन्न येणार का? ढगफुटीमुळे भातशेती गेली वाहून

हंसराज भोये


मनखेड (जि. नाशिक) : सुरगाणा तालुक्यात मागील आठवड्यात परतीच्या पावसाने रोजच धुमाकूळ घातला. मनखेड परिसरातील अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. ढगफुटी, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट यामुळे अनेक शेतकऱ्यांची जनावरेही दगावली आहेत. भात शेती हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून नेला आहे, निदान खाण्यापुरते तरी उत्पन्न येईल की नाही याचीच चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

एका बाजूला सुख तर दुसऱ्या बाजूला दुःख

कुणाच्या शेतातून पाणी वाहते तर कुणाचे शेतपिके वादळाने जमीनदोस्त केली आहेत, अशी या भागातील स्थिती आहे. दोन वर्षापासून नैसर्गिक आपत्ती, त्यातच कोरोनामुळे (Corona) शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असून त्यातच पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शेतकरी परतीच्या पावसामुळे अडचणीत सापडला आहे. या पावसामुळे तालुक्यातील नदी, नाले, बंधारे ओसंडून वाहत आहेत. असे असले तरी एका बाजूला सुख तर दुसऱ्या बाजूला दुःख अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.


मनखेड परिसरातील जायविहीर या गावांमध्ये पावसामुळे भातशेती, वाल, वरई याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मनोहर भोये, रामदास भोये, खंडू भोये, यशवंत भोये, शंकर चौरे, हिरामण भोये, अमृता भोये यांच्या शेतीची मोठी हानी झाली आहे. या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई द्यावी, यावर उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Delay Maharashtra : आधी 11, मग 15 अन् आता थेट...; महाराष्ट्रात 'या' तारखेला मान्सून सक्रिय होणार! हवामान खात्याचा नवा अंदाज, यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस?

Sanchita Ugale: छावा चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीने संपवलं जीवन, नालासोपाऱ्यातील राहत्या घरात आढळला मृतदेह; DDLJ मध्येही काम केलं होतं

पाकिस्तानी हवाई दलाचं विमान कोसळलं, २ पायलटचा मृत्यू; घटना CCTVत कैद

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत अधिकाऱ्यासमोर शिवसैनिकांनी निमंत्रण पत्रिका फाडली

IND A vs SL A: दुष्काळात तेरावा महिना! विपराज निगमच्या चुकीचा फटका; भारताच्या धावा ICCने कमी केल्या, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT