Overflowing Darna Dam esakal
नाशिक

Nashik Rain: 1 हजार 528 ने पावसाची तूट! इगतपुरीत निराशा

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी : तालुक्यातून पाऊस आता परतीला निघाला आहे. पावसासोबत येणारे नैऋत्य मोसमी वारेही परतीच्या मार्गावर निघाले आहेत. यंदा पावसाळ्याचे चार महिने बघता-बघता निघून गेले. अधूनमधून दमदार पावसाने हजेरी लावली. तरीही पावसाची नाशिक जिल्ह्यात ३१ टक्के तूट झाली आहे.

इगतपुरी तालुक्यात फक्त ५५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने सिंचन प्रकल्पांची स्थिती सुधारली असली, तरी आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. (Rain deficit by 1 thousand 528 Disappointment in Igatpuri nashik)\

यंदा सुरवातीपासूनच पावसाचा जोर कमी अधिक राहीला आहे. जून महिन्यात दांडी मारलेल्या पावसाने थेट जुलैच्या मध्यावर एंट्री करून हजेरी कायम ठेवली. मात्र, अपेक्षित पातळी सुधारली नाही.

जुलैचा अर्धा महिना, तसेच ऑगस्टमधील बरसात वगळता सातत्य राहिले नाही. उरली सुरली सगळी अपेक्षा सप्टेंबरमध्ये होती. त्यात अपेक्षापूर्ती होऊन धरणांनी शंभरी गाठली. मात्र, पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास ते धरणांमध्ये ठेवता येत नाही.

त्यामुळे वेळोवेळी विसर्ग वाढवून पाणी सोडण्यात आले. तरीही पाचपेक्षा धरणांमध्ये आजही १०० टक्के पाणीसाठा असला, तरी तो फक्त आकडेवारी पुरता मर्यादित आहे.

१५ पैकी १२ तालुक्यांत ७५ टक्के पाऊस

यंदाच्या हंगामात नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी १२ तालुक्यांत ७५ टक्के पावसाची नोंद घेण्यात आली. इगतपुरी तालुक्यात सरासरीनुसार केवळ ५५ टक्के पाऊस झाला आहे, तर त्र्यंबकेश्वर तालुक्यात ७४.५ टक्केच पाऊस झाला आहे.

दिंडोरी तालुक्यातील ११९ टक्के पाऊस झाल्याचा आशावाद वगळता इतर तालुक्यातील आकडेवारी पूर्णतः निराशावादी आहे.

इगतपुरी तालुक्यात मागील वर्ष या तारखेला एकूण ४ हजार ९८३ मिलिमीटरची नोंद झाली होती. यंदा मात्र याच दिवसापर्यंत फक्त ३ हजार ४५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने मागील वर्षाच्या तुलनेत १ हजार ५२८ ने पावसाची तूट आली आहे.

आकडे बोलतात

वर्ष : हंगामात झालेला पाऊस असा

२०१८ : ३ हजार २८०

२०१९ : ५ हजार ३३६

२०२० : ३ हजार ७९३

२०२१ : ३ हजार ११७

२०२२ : ४ हजार ९८३

२०२३ : ३ हजार ४५५

आजअखेर तालुक्यातील धरणांमधील जलसाठा (सर्व आकडे टक्केवारीत)

दारणा : १००

भावली : १००

मुकणे : ९५

वालदेवी : १००

कडवा : १००

गंगापूर : ९५

वाकी : ९०

भाम : १००

वैतरणा : ९५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT