rain sakal
नाशिक

Nashik rain updates | देवळा तालुक्यात रिमझिम पाऊस

पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

देवळा (जि. नाशिक) : तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. खरीप पिकांना जोरदार पावसाची गरज असली तरी गेले काही दिवस ढगाळ वातावरण व नुसता तुषार सिंचनासारखा तुरळक पाऊस अशी स्थिती होती. मात्र, आज दिवसभर रिमझिम पावसाचे वातावरण राहिले. (Nashik rain updates)

पावसाळा लागून एक महिना झाला असला तरी येथील नद्या, नाले, धरणे, तलाव कोरडे आहेत. इतर भागात मुसळधार पावसाने हाहाकार माजवलेला असताना या भागात मात्र जोरदार पाऊस नाही. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. मका, बाजरी, भुईमुग, सोयाबीन, ज्वारी अशी खरीप हंगामातील पिके पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मोठा पाऊस नसल्याने लवकर पेरणी केलेल्या मका पिकावर लष्करी अळी दिसू लागली आहे. जोरदार पाऊस न आल्यास खरीप हंगामातील उत्पन्नात मोठी घट येवू शकते. खते, बियाणे, मजुरी असा मोठा खर्च करत शेतकऱ्यांनी खरीप हंगाम घेतला असला तरी मोठा पाऊस नसल्याने पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. शुक्रवारी दुपारपासून पश्‍चिम भागात पाऊस असला तरी पूर्व भागात मात्र त्याचे प्रमाण कमीच होते. पावसाची रिमझिम चालू राहिल्याने शेतीची कामे बंद राहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Massajog Election: मोठी बातमी! स्व. संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव; स्वरुपानंद देशमुख विजयी

Kolhapur Viral Video Case : कोल्हापूर शिरोली अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणातील नवी अपडेट समोर, शाहरुख निघाला सरकारी नोकर

Pakistan Petrol Crisis: पाकिस्तानमधलं तेलं संपलं! खुद्द पेट्रोलियम मंत्र्यांनी व्यक्त केली खंत; म्हणाले भारताला एका सहीवर...

Video Viral: रियान परागवर बंदी? ड्रेसिंगरूममध्ये 'व्हॅपिंग' करताना दिसला; BCCI कठोर कारवाईच्या तयारीत

Latest Marathi News Live Update : मस्साजोगमध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव

SCROLL FOR NEXT