PM SHRI Yojana esakal
नाशिक

PM SHRI Yojana: ‘पीएमश्री’अंतंर्गत शाळांवर सुविधांचा पाऊस! प्रत्येक शाळा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत

विजय पगारे

इगतपुरी (जि. नाशिक) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार राज्यातील ८४६ शाळांची ‘पीएमश्री’साठी निवड करून या शाळांचा सर्वांगिण विकास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १५ हजाराहून अधिक शाळा उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून विकसित करण्यात येणार असून यात राज्यातील ८४६ शाळांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रत्येक शाळेसाठी १ कोटी ८८ लाख एवढी तरतूद ५ वर्षांसाठी करण्यात आली आहे. या योजनेतील दुसऱ्या टप्प्यात ४०८ गट, २८ महानगरपालिका आणि ३८३ नगरपालिका व नगरपरिषदा यामधून पीएमश्री शाळांची निवड केली जाणार आहे. (Rain of facilities on schools under PM SHRI scheme Each school conforms to National Education Policy nashik news)

या शाळांमधून अनुभवात्मक पद्धतीने आनंददायी शिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची वैचारिक समज आणि वास्तविक जीवनातील त्याचा ज्ञानाचा वापर आणि योग्यतेवर आधारित मूल्यांकन करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांची शाळेतून गळती झाल्यास त्यांना पुन्हा प्रवेश देऊन अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या शाळांचा विकास प्रामुख्याने पुढील ६ प्रमुख आधार स्तंभावर केला जाईल.

त्यात अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र व मूल्यमापन; प्रवेश आणि पायाभूत सुविधा, मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व, समावेशक पद्धती व समाधान, व्यवस्थापन, देखरेख आणि प्रशासन, लाभार्थी समाधान यांना प्राधान्य राहणार आहे.

राज्यस्तरावरून अंमलबजावणी

योजनेची अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती, जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती आणि महापालिकास्तरावर महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समित्यांमार्फत केली जाईल.

राज्य प्रकल्प संचालक हे राज्य अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष असतील. शाळांच्या विकासाचे काम टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे.

हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

पीएमश्री शाळेची १२ वैशिष्ट्ये अशी

‘पीएम श्री’ च्या शाळा या आदर्श विद्यालये म्हणजेच मॉडेल स्कूल असतील. पूर्णपणे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी (NEP) सुसंगत असतील. शाळांचे पूर्णपणे आधुनिकीकरण केले जाईल. इमारतींचीही सुधारणा पायाभूत सुविधांनुसार केली जाईल.

स्मार्ट क्लासरूम तर असतीलच, शिवाय संगणक प्रयोगशाळेपासून विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यामध्ये एनईपी अंतर्गत प्ले स्कूल देखील असतील. या शाळांत तिसरी ते बारावीपर्यंतचे वर्ग शिकवले जाणार आहेत. या शाळांसाठी एकूण ६० मानके निश्चित करण्यात आली आहेत.

विविधांगी प्रयोगांची रेलचेल, खेळही

या शाळांमध्ये अधिकाधिक प्रायोगिक, परिवर्तनात्मक आणि सर्वांगीण विकास, एकात्मिक पद्धती (ज्यात सर्व प्रकारचे इनडोअर आणि आउटडोअर अ‍ॅक्टिव्हिटी असतील) शिकवण्यासाठी आणि शिकण्यासाठी अवलंबल्या जातील.

या शाळांमध्ये डिस्कव्हरी ओरिएंटेड आणि लर्निंग सेंट्रिक टीचिंग मेथड राबविण्यात येणार आहे. नवीन गोष्टी शिकण्याची आणि शोधण्याची क्षमता मुलांमध्ये विकसित होईल अशा पद्धतीने ते शिकवले जाईल.

खेळ आणि खेळण्यांवर आधारित अध्यापनात शिकले जाईल. शिवाय लोकप्रिय खेळांचाही समावेश असेल. विशेष म्हणजे प्रत्येक वर्गातील प्रत्येक मुलावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ganpati Visarjan 2025 Live Updates : गणेश विसर्जन मिरवणुकीत कोल्हापुरात सौम्य लाठीमार

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

IndiGo flight technical glitch: कोचीहून अबुधाबीला १८० प्रवाशांसह निघालेल्या इंडिगो विमानात उद्भवला तांत्रिक बिघाड अन् मग...

"नागरिकांच्या जीवाची किंमत आहे का ?" टेस्ला कार घेतल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांना अभिनेत्याचा सवाल, "एवढा पैसा कुठून आला ?"

SCROLL FOR NEXT