Discharge initiated from a dam. In the second photograph, the water released into the Unanda river basin esakal
नाशिक

Nashik Rain Update: पुणेगाव धरणात 92 टक्के साठा; ओझरखेड भरण्याच्या आशा पल्लवीत

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Update : येवला व चांदवड तालुक्याला जलसंजीवनी देणारा देवसाने (मांजरपाडा) वळण योजना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. प्रकल्पाच्या कालव्यातून पूर्णक्षमतेने पाणी आल्याने पुणेगाव धरणात ९२ टक्के साठा झाला आहे.

पुणेगाव धरणातून रविवारी (ता. ६) दुपारपासून विसर्ग सुरू केल्याने ओझरखेड धरण भरण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. (Rain Update 92 percent storage in Punegaon Dam nashik)

गुजरात राज्य व समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणारा राज्यातील पहिला प्रकल्प असलेला देवसाने (मांजरपाडा) वळण योजना प्रकल्पांतर्गत असलेल्या ३४५० मीटर लांबीच्या धरणातील पाणलोट क्षेत्रात गेल्या १५ ते २० दिवसांपासून संततधारेने धरणाच्या साठ्यात वाढ होऊन धरणाच्या सुमारे १० किलोमीटर लांबीच्या बोगदा असलेल्या कालव्यातून पाणी वाहू लागले आहे.

कालव्यातील पाणी उनंदा नदीद्वारे पुणेगाव धरणात येऊ लागले. दोन दिवसांत २० टक्क्यांनी वाढल्याने रविवारी पुणेगाव धरण ९२ टक्के भरले. यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने उनंदा नदीपात्रातून पाणी ओझरखेड धरणात येऊ लागले आहे.

त्यामुळे तिसगाव धरणापाठोपाठ सर्वांत कमी जलसाठा असलेल्या ओझरखेड धरणाच्या जलसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मांजरपाडा प्रकल्प लाभक्षेत्रात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास ओझरखेड धरणही दहा ते बारा दिवसांत ओव्हरप्लो होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पुणेगाव धरण भरल्याने दिंडोरी तालुक्यासह येवला, चांदवड, निफाड तालुक्यातील जनतेची चिंता काहीशी दूर होत दिलासा मिळाला आहे.

दिंडोरी तालुक्यातील धरणांचा पाणीसाठा

करंजवन धरण ५० टक्के, पुणेगाव धरण ९२ टक्के, पालखेड धरण ७१ टक्के, वाघाड धरण ६४ टक्के, ओझरखेड धरण ३० टक्के, तीसगाव धरण ० टक्के.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaiwal: "तानाजी सावंतला मध्ये का घेतोस? मी घरी येतो नाहीतर.." गुंड निलेश घायवळचा धमकीवजा फोन कॉल

Drishyam 3 : आता येतोय दृश्यम 3 ! अजय देवगण 'या' तारखेला करणार सिनेमाची घोषणा

Nagpur Crime: नागपूर हादरलं! गरोदर महिलेचा खून करुन रस्त्याच्या कडेला फेकलं; 'अशी' उघडकीस आली घटना

Viral: मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्याचे लाजिरवाणे कृत्य, रुग्णाला बिस्कीट दिले, फोटो काढला अन् परत घेतले, पाहा व्हिडिओ

Latest Marathi News Live Update: गरोदर महिलेचा खून करून फेकले रस्त्याचा कडेला, दुर्गंधी सुटल्याने घटना आली समोर..

SCROLL FOR NEXT