Raj Thackeray
Raj Thackeray esakal
नाशिक

Raj Thackeray Nashik Daura : राज ठाकरेंचा नाशिक दौरा, या तीन महापालिका निवडणुकांसाठी मनसेने कसली कंबर

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पुणे येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असताना लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून पाहिले जात आहे.

तर दुसरीकडे शुक्रवारपासून तीन दिवस नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) नाशिकसह औरंगाबाद, धुळे येथील महापालिका निवडणुकीची तयारी करणार आहे. (Raj Thackeray MNS President will preparing for Nashik Municipal Elections nashik news)

निवडणुकीची तयारी करताना संघटनात्मक बांधणीवरदेखील लक्ष दिले जाणार आहे.

राज ठाकरे सप्टेंबर २०२१ मध्ये नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यानंतर तब्बल वीस महिन्यांनी ते नाशिकमध्ये येत आहे. १९ मेपासून तीन दिवस राज ठाकरे नाशिकमध्ये राहणार असून नाशिकसह धुळे व औरंगाबाद येथील महापालिका निवडणुकीचादेखील आढावा घेणार आहेत. त्याचबरोबर संघटना बळकटीकरणासाठी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे.

शासकीय विश्रामगृहावर या बैठकीत होतील. सायंकाळी सातच्या दरम्यान त्यांचे आगमन होईल. शनिवारी (ता. २०) विभाग अध्यक्ष व शाखाध्यक्षांबरोबर संवाद साधला जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शासकीय विश्रामगृहावर सकाळी आठपासून शाखाध्यक्षांसोबत बैठक होईल.

पूर्व विधानसभा मतदार संघासाठी सकाळी साडेआठ ते दहा या वेळात बैठक होईल. सकाळी दहा वाजता शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद होईल. दुपारी महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक होईल.

रविवारी (ता. २१) सकाळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहे. वास्तुविशारद संघटना तसेच क्रेडाई मेट्रो पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT