Raj Thackrey Nashik Visit Esakal
नाशिक

Raj Thackrey Nashik Visit: मनसे महाविकास आघाडीसोबत जाणार का? राज ठाकरे म्हणाले, 'यांच्याकडे कोण...'

Raj Thackrey On Manoj Jarange: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. ठाकरे यांचा आजचा दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. ठाकरे यांचा आजचा दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न केला की ते महाविकास आघाडीसोबत जाणार का त्यावर बोलताना ते म्हणाले, 'यांच्याकडे कोण जाईल, मुळात आताचे लवंडे कधी कुठे लवंडतील माहिती नाही. यांचा काही भरवसा आहे का? कोण जाईल यांच्याकडे? इंडिया आघाडीत नितीश कुमारही होते, कुठे गेले?' असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

त्याचबरोबर देशात आणि राज्यात विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडी कारवाई होताना दिसत आहे. नुकतेच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने ५ वेळा समन्स बजावलं आहे. सातत्याने विरोधी पक्षांच्या नेत्यावर होणाऱ्या कारवाईवरती देखील राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात सुरू असलेलं राजकारण भविष्यात भाजपला परवडणार नाही. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेलं नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर उद्या हातातून सत्ता गेल्यास काय होईल याचा विचार देखील सत्ताधाऱ्यांनी करायला हवा असं देखील त्यांनी पुढे म्हटलं आहे.

टोलचा पैसा अनेक पक्ष निधीसाठी वापरला जातो- राज ठाकरे

तर टोलसंबधी विषयावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, माझा टोलला विरोध नाही, टोल वसुलीवर जी कॅश घेतली जाते त्याला विरोध आहे. टोल या विषयावर मी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मी उद्या भेट घेणार असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुंबईतील टोलनाक्यावरील आम्ही जे चित्रण केलं आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवणार आहे. टोलमधून जमा होणाऱ्या पैशाबाबत मोठा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी केला आहे. टोलचा पैसा अनेक पक्षांना पक्ष निधीसाठी वापरला जातो. यासंबधी मलाही ऑफर आली होती, मी म्हटलं इथेच मारेल तुला, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

'तुमच्या मनासारखं घडलं मग उपोषण कशाला'

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारकडे केलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. तरी देखील मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू राहणार असं म्हटलं आहे. त्यावर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना सवाल केला आहे. तुमच्या मनासारखं घडलं मग उपोषण कशाला असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT