Senior Congress leader Rajaram Pangawane enjoying the kite festival. Neighboring regional secretary Ramesh Kahandol, city president Pritam Patni and other officials. esakal
नाशिक

Rajaram Pangavane | आगामी निवडणुकांत काँग्रेसचा पतंग भरारी घेणार! : राजाराम पानगव्हाणे

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : काँग्रेसने चांगले संघटन उभे केले आहे. आगामी पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा पतंग भरारी घेईल, असा आशावाद काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी व्यक्त केला.

लोक सरकारला कंटाळले असल्याने त्यांना परिवर्तन हवे असल्याने नक्कीच परिवर्तन घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Rajaram Pangavane statement kite of Congress will take flight in upcoming elections nashik political news)

येथील जगप्रसिद्ध पतंग उत्सवात सहभागी होऊन काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी पतंग उडविण्याचा आनंद घेतला. काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष प्रीतम पटणी यांच्या घराच्या छतावर पतंगोत्सव साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, प्रदेश सचिव रमेश कहांडोळ, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, जिल्हा सरचिटणीस भय्यासाहेब देशमुख यांनी हजेरी लावून पतंग उत्सवाचा आनंद घेतला.

श्री. पानगव्हाणे म्हणाले, येवल्यात काँग्रेसने चांगले संघटन उभारले असून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसचीच सत्ता येईल. काँग्रेसने संघटनात्मक निवडी केल्या असून, येथे तरुण कार्यकर्ते असलेले समीर देशमुख व प्रीतम पटणी यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

गाव ते राज्यपातळीपर्यंत चांगले संघटन उभे असल्याने काँग्रेस नक्कीच भरारी घेईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

पदवीधर निवडणुकीतील उमेदवार सत्यजित तांबे यांच्यासंदर्भात विचारले असता पक्षाला धोका पोचला असे वर्तन नेत्यांनी करू नये, असे श्री. पानगव्हाणे म्हणाले. केंद्र सरकारने जनतेला महागाई दिली, शेतमालाला भाव नाही, अवकाळीची मदत मिळाली नसून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याने अनेक जण या सरकारला कंटाळले आहेत.

शहरातही विकास खुंटला असून, कोणी मंत्री आले तरी फरक पडणार नाही. येथे रस्त्याने चालता येत नाही, गटारी उघड्या आहेत. ऐतिहासिक भूमीचा विकास खुंटला असल्याने नक्कीच परिवर्तन होण्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, तालुकाध्‍यक्ष ॲड. समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, निराधार निराश्रित काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश गोंधळी, निवृत्ती लहरे, जिल्हा उपाध्यक्ष रश्मी पालवे, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीलम पटणी, बळिराम शिंदे, तालुका कार्याध्यक्ष सुकदेव मढवई,

तालुका संघटक अण्णासाहेब पवार, आबासाहेब शिंदे, शहर सरचिटणीस मुकेश पाटोदकर, तालुका सरचिटणीस दत्तात्रय चव्हाण, अमित पटणी, भास्कर पालवे, पंकज शहा, पंकज पटणी, एनएसयूआयचे तालुकाध्यक्ष अक्षय शिंदे, स्नेहल पटणी, अशोक नागपुरे, शेखर मेहता, सचिन पटणी, श्रेहंस पटणी, वैभव मेहता, दिलीप पटणी, सचिन पटणी, आत्मेश पटणी, विजय पटणी आदी उपस्थित होते.

"वर्षाच्या सुरवातीस हिंदू संस्कृतीमधील हा पहिला सण आहे, त्यामुळे याला विशेष महत्त्व आहे. पतंग जशी उंच जाते, त्याचप्रमाणे येणाऱ्या वर्षात काँग्रेसही पुन्हा एकदा उंच भरारी घेईल. काँग्रेस हा विचार आहे. देशाच्या उभारणीमध्ये सर्वात मोठा सहभाग हा काँग्रेसचा राहिलेला आहे. पतंग उत्सवात सर्वधर्मीय सहभागी होऊन हा उत्सव साजरा करतात. त्याचप्रमाणे काँग्रेसमध्ये सर्वधर्मिय समभाव याला सर्वोच्च प्राधान्य आहे. काँग्रेस आपली दमदार वाटचाल कायम ठेवेल, यात तीळमात्र शंका नाही."- राजाराम पानगव्हाणे, ज्येष्ठ नेते, कॉंग्रेस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT