Garbage empire at Rajmata Jijau Sports Complex Park.
Garbage empire at Rajmata Jijau Sports Complex Park. esakal
नाशिक

Nashik News: सोयी नको, निदान समस्या आवरा; राजमाता जिजाऊ क्रीडासंकुल उद्यान बनले समस्यांचे आगार

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : परिसरातील राजमाता जिजाऊ क्रीडासंकुल उद्यानात विविध समस्या असून, या समस्या उद्यान विभागाने त्वरित मार्गी लावण्याची माफक अपेक्षा स्थानिक रहिवाशांकडून होत आहे. काही खेळणी तुटलेल्या अवस्थेत असून काही खेळणी उत्तम स्थितीत आहे. येथील सफाई नित्यनेमाने करायला हवी तर कचरादेखील आठवडे, दोन आठवड्यातून उचलला जात असून तोदेखील लवकर उचलला जायला हवा, अशी मागणी आहे. (Rajmata Jijau Sports Complex Park in bad condition Nashik News)

ग्रीन जिमचे काही साहित्य तुटलेल्या अवस्थेत असून ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना या जिमचा उपभोग घेता येत नाही. तुटलेल्या साहित्यांची दुरुस्ती करण्याऐवजी त्यांना दोरीच्या सह्याने बांधून ठेवण्यात आले आहे. उद्यान म्हणजे मद्यपींना फुकट बसण्याचे ठिकाण झाले असल्याचे दिसून येत आहे.

या उद्यानाच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही बसवण्यात आले असले तरी मात्र उद्यानात मद्यपी सर्रास मद्यप्राशन करत असल्याचे वास्तवादी चित्र समोर येत आहे. उद्यानाच्या आवारात रिकाम्या पडलेल्या बाटल्या याबाबतची साक्ष देत असतात .काही ठिकाणी पथदीपांच्या उघड्या तारा दिसून येत असून यावर सुरक्षा झाकण बसवणे गरजेचे आहे.

राजमाता जिजाऊ क्रीडासंकुल उद्यान

* कचरा समस्या
* खेळणी तुटलेल्या अवस्थेत
* ग्रीन जिमचे साहित्य तुटलेल्या अवस्थेत
* पथदीपांच्या विद्युत वाहिनी उघड्यावर
* स्वच्छतागृह सुरू करण्याची मागणी
* उद्यानात मद्यपींचा सुळसुळाट

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

"उद्यानातील काही खेळणी तुटलेल्या व नादुरुस्त अवस्थेत आहेत. हे सर्व व्यवस्थित व्हायला हवे. तर उद्यानातील स्वच्छतागृह सुरू होणेदेखील गरजेचे आहे." - जया रडके, गृहिणी

"उद्यानामध्ये थाटात ग्रीन जिम बसवण्यात आली खरी, मात्र ग्रीन जिमचे साहित्य तुटलेल्या अवस्थेत असून त्यास सुधारण्याची तसदी मात्र कोणी घेत नाही. तुटलेल्या साहित्यास सरळसरळ दोरीच्या सह्याने बांधून ठेवण्यात आलेले आहे."- नलिनी बोडके, गृहिणी

"उद्यानात पथदीपांचा वीजतार उघड्या असून लहान मुले कुतूहलाने खेळता खेळता चुकून यांना स्पर्श करू शकतात. सर्वप्रथम यांना बंदिस्त करायलाच हवे, तर ग्रीन जिमचे साहित्यदेखील दुरुस्त करून द्यावे."- ज्योती पाटील, गृहिणी

"उद्यानात रात्री मद्यपी मद्यप्राशन करण्यासाठी बसलेले असतात. त्यांच्याकडे बघून ते गुंड प्रवृत्तीचे असल्याचे लक्षात येते. त्यांना काही बोललो तर अंगावर धावून येण्याचे प्रकार घडतात. पोलिसांनी रात्रीच्या गस्त वाढवण्याची गरज आहे." - एक गृहिणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT