Officials and members of Shiledar Foundation while celebrating Rakshabandhan in a settlement. esakal
नाशिक

Rakshabandhan 2023 : ‘शिलेदारां’चे अनोखे रक्षाबंधन; गरीब वस्तीत जाऊन साजरा केला सण

योगेश बच्छाव

Rakshabandhan 2023 : रक्षाबंधन म्हणजे रक्षण आणि बंधन यांचा समन्वय होय. आपल्या हिंदू धर्मात या सणाला फार मोठे महत्त्व आहे. यात बहीण भावाला हाताच्या मनगटाला राखी बांधते अन् आपले रक्षण करण्याचे वचन भावाकडून घेते.

हाच धागा पकडत समाजातील तळागाळातील वंचित लोकांना मदत व्हावी, हा प्रामाणिक हेतू ठेवून ‘शिलेदार फाउंडेशन, मालेगाव जे ‘वसा कतृत्वाचा’ हे ब्रीद घेऊन आपल्या कमाईतून काही भाग काढून ठेवतात अन् आपण समाजाचं देणं लागतो, या भावनेतून मदत करतात. (raksha bandhan 2023 Officials and members of Shiledar Foundation celebrated Raksha Bandhan in settlement nashik news)

शिलेदार फाउंडेशन यांनी वडगाव येथील गरीब वस्तीत जाऊन तेथील महिलांना मदत व्हावी, या उद्देशाने अनोखे रक्षाबंधन साजरे केले. महिलांना साडी भेट देत, तेथील कुटुंबांना फरसाण, गोड खाऊ दिला. त्या कुटुंबातील महिलांना, त्यांच्या परिवाराला झालेला आनंद हाच शिलेदार फाउंडेशनकरिता ऊर्जादायी ठरला.

या वेळी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी येथील महिलांकडून राखी बांधून घेत त्यांना भेटवस्तू दिल्या. फाउंडेशनचे संस्थापक भास्कर पवार, अध्यक्ष कैलास बच्छाव, प्रसिद्धीप्रमुख भरत पाटील, सचिव अनिल सोळुंके यांनी फाउंडेशनचा हेतू सांगितला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या वेळी उपाध्यक्ष योगेश बच्छाव, खजिनदार संदीप गांगुर्डे, सदस्य राजकिरण राजपूत, संदीप जाधव, अमोल ठोके, भाविक पाटील, सुनील खैरे, प्रताप सरावत, विजय रौंदळ, वैभव सोनवणे, स्वप्नील पवार, नीलेश पवार या सर्वच शिलेदारांनी येथील भगिनीकडून राखी बांधत दर वर्षी याच ठिकाणी रक्षाबंधन साजरा करण्याचा निश्चय केला.

"आपण समाजाचे काही देणं लागतो, या हेतूने शिलेदार फाउंडेशनची स्थापना झाली. आम्ही सर्व सदस्य आपल्या कमाईतून काही भाग काढून सामाजिक काम करण्यासाठी पुढाकार घेतो. वडगाव परिसरातील एका वस्तीवर जाऊन आम्ही तेथे रक्षाबंधन साजरे केले. दर वर्षी आम्ही या ठिकाणी रक्षाबंधन साजरे करू."- भास्कर पवार संस्थापक, शिलेदार फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT