Nashik Ram Rathotsav 2023 esakal
नाशिक

Nashik Ram Rathotsav 2023 : पोलिस, मनपाकडून रथ मार्गाची पाहणी; तयारी अखेरच्या टप्प्यात!

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : रामनवमीनंतर येणाऱ्या भागवत एकादशीला नाशिकचा प्रसिद्ध रथोत्सव (Nashik Ram Rathotsav) साजरा केला जातो. (ram rathotsav Rath Marga was inspected by police on Monday 27 for security reasons nashik news)

यात श्रीराम व गरुड असे दोन रथ सहभागी होत असतात. या वर्षी हा रथोत्सव रविवारी (ता. २) साजरा करण्यात येत असून, सुरक्षेच्या दृष्टीने या रथ मार्गाची सोमवारी (ता. २७) पोलिसांकडून पाहणी करण्यात आली. या वेळी श्रीराम रथोत्सव समितीतर्फे पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी रथोत्सव समिती व काळाराम संस्थानचे पदाधिकारी या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते.

या पाहणी दौऱ्यात पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, गंगाधर सोनवणे, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, साजन सोनवणे, पंचवटी विभागीय अधिकारी नरेंद्र शिंदे, स्मार्टसिटी कंपनीचे उपव्यवस्थापक किसन कानडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप दाळू, काळाराम संस्थानचे विश्वस्त मंदार जानोरकर, धनंजय पूजारी यांच्यासह रथोत्सव समिती पदाधिकारी सहभागी झाले होते.

श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून सोमवारी या रथमार्गाचा पाहणी दौऱ्याला सुरवात झाली. श्रीराम व गरुड रथ ज्या मार्गाने नेले जातात अशा नाग चौक, काट्या मारुती चौक, गणेशवाडी, गौरी पटांगण, गाडगे महाराज पुलाखालील भाग, रोकडोबा तालीम, नेहरू चौक, म्हसोबा पटांगण, सरकारवाडा, भांडी बाजार, कपूरथळा मैदान, कपालेश्वर चौक या भागातील रस्त्यांची पाहणी करण्यात आली.

त्याचप्रमाणे दोन्ही रथाची पाहणी करून, रथ मिरवणुकीच्या वेळी येणाऱ्या अडीअडचणी मंदिर विश्वस्तांकडून जाणून घेतल्या. या पाहणी दौऱ्याच्या वेळी उपस्थित असलेल्या स्मार्टसिटी कंपनी, महापालिका, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांना रथाच्या मिरवणुकीच्या मार्गावरील सध्या रस्त्याचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण करण्याच्या तसेच अनावश्यक खडी-मुरूम उचलून घेण्याच्या, उतार सुलभ करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

ज्या भागात विद्युत तारा खाली आहेत, त्या उंच करून घेण्यात याव्यात. मिरवणूक मार्गातील अतिक्रमणे हटवावीत, अनधिकृत होर्डिंग, बॅनर्स काढावे, मिरवणुक मार्गातील धोकादायक वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करावी आदी कामे या महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT