Rampraveen Swaminathan statement of Nasik to become logistics hub nashik news 
नाशिक

Nashik News : नाशिक बनणार लॉजिस्टिक्स हब : रामप्रवीण स्वामिनाथन

महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या दुसऱ्या वेअरहाऊसचे उद्घाटन बेळगाव ढगा येथे झाले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या दुसऱ्या वेअरहाऊसचे उद्घाटन बेळगाव ढगा येथे झाले. ८३ हजार स्क्वेअर फूट क्षमता असलेले हे वेअरहाऊस ‘ग्रीन बिल्डिंग’ म्हणूनही प्रमाणित झाले आहे.

तर शेकडो कोटींची गुंतवणूक करत तिसऱ्या सर्वात मोठ्या वेअरहाऊस प्रकल्पाचे वासाळी शिवारात भूमीपूजन प्रजासत्ताक दिनी महिंद्रा लॉजिस्टिकसचे एम.डी. व सी.ई.ओ रामप्रवीण स्वामिनाथन यांच्या हस्ते झाले. (Rampraveen Swaminathan statement of Nasik to become logistics hub nashik news)

यावेळी महिंद्रा अँड महिंद्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष विनय खानोलकर, महिंद्रा लॉजिस्टिकसचे उपाध्यक्ष राजेश शेट्टी, मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, महिंद्राचे वरिष्ठ अधिकारी अशोक बोरसे, निंबा पाटील आदी उपस्थित होते. स्वागत जे के वेअरहाऊसचे संचालक शशिकांत जाधव व संजय कोठुळे यांनी केले.

लॉजिस्टिक्स क्षेत्रात भिवंडीनंतर नाशिकचे भौगोलिक स्थान अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. समृद्धी महामार्ग तसेच सुरत-चेन्नई हायवेमुळे नाशिकची कनेक्टिविटी गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू अशा अनेक राज्यांसोबत होणार आहे. त्यामुळे माल वाहतुकीसाठी नाशिक सोईस्कर ठरत आहे. त्याच अनुषंगाने महिंद्रा लॉजिस्टिकसने नाशिकवर लक्ष केंद्रित केले आहे.

वासाळी शिवारात एनएसजे ग्लोबल लॉजिस्टिक्स या तिसऱ्या प्रकल्पाचे सुमारे पन्नास एकरच्या जागेत भूमिपूजनही यावेळी झाले. ३ लाख स्क्वेअर फुटाचे भव्य वेअरहाऊस येथे येत्या वर्षभरात कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती स्वामिनाथन यांनी दिली. जाधव यांच्यासोबत महिंद्रा लॉजिस्टिक्स यापुढेही मागणीनुसार वेअरहाऊस वाढवणार असल्याचे घोषणा त्यांनी केली.

शलाका विधाते यांनी सूत्रसंचालन तर महिंद्रा लॉजिस्टिकसचे नाशिक विभागप्रमुख निसार जमादार यांनी आभार मानले. यावेळी स्वामिनाथन यांच्या हस्ते वेअर हाऊसच्या सर्व कंत्राटदारांचा सत्कार झाला. वेअरहाऊसचे संचालक भाऊसाहेब कोठुळे, धनंजय कोठुळे, शंतनू जाधव, शुभम जाधव यांच्यासह पुंडलिक निगळ, सुदाम निगळ, केशव निगळ, दीपक ढोमसे, अभिषेक निगळ व निमा, आयमाचे उद्योजक प्रतिनिधी उपस्थित होते.

''गेल्या तीन वर्षांत या ठिकाणी शेकडो कोटीचे प्रकल्प साकारले आहेत, त्यातील पुढचा टप्पा हा मोठा असून सुमारे पन्नास एकर जागेत शेकडो कोटींची गुंतवणूक करत सुमारे तीन लाख स्वेअर फुटाचा वेअरहाऊस प्रकल्प साकारणार आहे. यात किमान पाचशेपेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी रोजगार उपलब्ध होणार आहे. ही नाशिकसाठी व आमच्या कंपनीसाठी मोठी उपलब्धी आहे.''-महिंद्रा लॉजिस्टिकसचे एम.डी.व सी.ई.ओ. रामप्रवीण स्वामिनाथन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT