Ramzan festival Bakery Products Double in demand Nashik News esakal
नाशिक

Ramzan Festival | 100 टन मैद्या फस्त; मागणीत दुपटीने वाढ

जलील शेख

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात रमजान पर्व सुरू झाल्याने विविध खाद्य पदार्थांच्या मागणीत दुप्पट वाढ झाली आहे. प्रामुख्याने फळे, नान, खजूर, सुत्तरफेणी, सरबत आदींची विक्री वाढली आहे. दिवसभराच्या उपवासासाठी जड व मैद्याच्या पदार्थांना पसंती दिली जाते. यामुळे मैदा विक्रीतही वाढ झाली आहे. शहरातील बेकरी (bakery) व लहान- मोठ्या किराणा दुकानातून रोज सुमारे शंभर टन मैदा विक्री होत असून, एवढ्या मैद्याचे पदार्थ रोजेधारक व खव्वये रोज फस्त करीत आहेत.

रमजान (Ramzan Festival) पर्वाबरोबरच उन्हाळ्यात वाळवन तयार करतात. छोट्या- मोठ्या किराणा दुकानातून मैद्याचे पापड तयार करण्यासाठीही मैद्याला मागणी आहे. शहरात सात दशकापासून मैद्याची विक्री होते. इंधन दरवाढ झाल्याने मैद्याचे भाव वाढले आहे. गेल्या दोन वर्षापासून सर्वत्र कोरोनाचे (Corona) सावट होते. कोरोना काळात मैद्याला मागणी कमी होती. येथे मैदा विक्रीची २० पेक्षा अधिक मोठी दुकाने आहेत. या दुकानात रमजान काळात अंदाजे दररोज १०० टन मैदाची विक्री होते. या महिन्यात मैद्याला मागणी दुप्पटीने वाढते. मैद्यापासून नान, सुतरफेणी, पापड, समोसा यासह अनेक खाद्यपदार्थ तयार केले जातात. शहरात सुतरफेणी १५ तर २५ ठिकाणी नान तयार होतो.

शहरात मैदा लखनौ, कानपूर, शाहजानपूर, औरंगाबाद येथून मोठ्या प्रमाणात येतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत मैदाच्या ५० किलो गोणी मागे ८० ते १०० रुपयांची वाढ झाली आहे. मैदा महाग झाला तरी त्याच्या मागणीत घट झाली नाही. रमजान महिन्यानंतर मैदा विक्रीत घट होईल, असा अंदाज आहे. रमजान महिन्यात शहरात मैद्याचे पदार्थ कमी पडत असल्याचे दिनेश चौधरी यांनी सांगितले.

खाद्यपदार्थांना मोठी मागणी

येथे बटाटा समोसा, बीफ समोसा यांचाही शहरातील अनेक चौका चौकात दुकाने थाटली आहे. विशेष बाजारात खाद्यपदार्थांना मोठी मागणी वाढते. रोजेधारक उपवास सोडताना व सुरु करताना (अफ्तारी व सहेरी) कचोरी, समोसा, नान यासह मैद्यापासून तयार झालेल्या विविध खाद्यपदार्थांचे सेवन करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT