Yevlekar participated occasion of Rangpanchami. esakal
नाशिक

Rang Panchami Festival : येवलेकरांमध्ये रंगले सप्तरंगी रंगयुद्ध! आगळीवेगळी रंगपंचमी, बघा काय खास

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : एकावेळी आमने-सामने आलेले ३०-४० ट्रॅक्टर..अन्‌ सुमारे १०० वर ट्रॅक्टरमधून झालेली रंगाची उधळण, प्रत्येक ट्रॉलीत रंगाने भरलेले टीप अन दहा ते पंधरा युवक तर मोकळ्या पटांगणातही एकत्रित आलेले हजारो शौकीन येवलेकर..

सगळ्यांकडून एकमेकावर होणारी रंगांची उधळण तीही प्रेम व स्नेहपूर्वक...असे जगावेगळे अन्‌ नजरेत साठवून ठेवावे असे चित्र येथे रविवारी टिळक मैदान व डी. जी. रोडवर रंगपंचमीनिमित्त झालेल्या सामन्यात दिसले. (Rang Panchami Festival seven color color war fought among Yeola people Different Rangpanchami see whats special nashik news)

पिंपांतील रंगांचे सपके परस्परांवर मारून रंगपंचमी साजरी करण्याची जुनी परंपरा आहे. आता तालमीसह विविध गणेश मंडळे, सांस्कृतिक मंडळे एकत्र येऊन परंपरागत रंगांचे सामने खेळतात. पूर्वीच्या बैलगाडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. पूर्वीच्या मामलेदार गल्लीतील सामन्यांची जागा आता टिळक मैदानाने घेतली आहे.

रविवारी सकाळपासूनच सारे शहर रंगात बुडाले होते. सायंकाळी शहरातील टिळक मैदानावर पाचला विविध तालीम संघ, मंडळे, संस्था आदींचे ट्रॅक्टर सामन्यांसाठी उपस्थित झाले. प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला.

माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, भाजपचे शहर उपाध्यक्ष दिनेश परदेशी, रंगपंचमी उत्सव समितीचे अध्यक्ष प्रभाकर झळके, शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, किशोर सोनवणे, भाजपचे आनंद शिंदे, संजय कुक्कर, लाला कुक्कर, बंडू क्षीरसागर, अविनाश कुक्कर, मुकेश लचके, संतोष परदेशी, कुमार कासार, भीमराज नागपुरे, राजेंद्र मोहारे, राजेंद्र घोडके, उदय परदेशी आदी उपस्थित होते. श्रीमान शेठ गंगाराम छबिलदास पेढीचे चालकांनी आपल्या कुटुंबासह परंपरेनुसार बालाजी मंदिरात देवाबरोबर रंग खेळले गेले, तर सायंकाळी सटवाईची मिरवणूकही निघाली होती.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

सामना पाहण्यासाठी महिलांची गर्दी

चौकाचौकात ध्वनिक्षेपकावर सुरात सूर मिळवून युवक रंगाची उधळण करीत होते. सांयकाळी टिळक मैदानात पहिला सामना येथे सुरु झाला. हलकडी, ढोल या पारंपारिक वाद्याच्या तालावर आबालवृद्धांनी वयाचे भान विसरुन ठेका धरत या सामन्यांचा आनंद लुटला.

यावेळी काहींनी लाठ्या काठ्या फिरवून प्रात्यक्षिकेही सादर केली. टिळक मैदानात ट्रॅक्टर व त्यात रंगांनी भरलेले ३० ते ४० टीप होते. हे समोरासमोर आले अन्‌ रंगोत्सवाला सुरवात झाली. परंपरेनुसार दुसरा सामना खेळण्यासाठी डी. जी. रोड येथे तालीम, मंडळे व युवा वर्ग आपले ट्रॅक्टर घेऊन येथील पटांगणात आले.

येथे नवभारत मित्र मंडळाचे अध्यक्ष अविनाश कुक्कर, माजी नगरसेवक संजय कुक्कर यांनी या ठिकाणी रंगपंचमी सामन्यांचे आयोजन केले होते. दोन्ही ठिकाणचे सामने पाहण्यासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT