woman molest.png
woman molest.png 
नाशिक

धक्कादायक! मैत्रिणीचे काढले नकळत फोटो व व्हिडिओ...व्हायरल करण्याची धमकी देत मागितले ७० हजार रुपये 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मैत्रीचा गैरफायदा घेत संशयिताने पीडितेला हॉटेल चंद्रलोक येथे नेले आणि जबरदस्तीने बलात्कार केला. पीडितेने प्रतिकार केला असता संशयिताने मारहाण केली. तसेच संशयिताने पीडितेच्या नकळत फोटो व व्हीडिओ काढून ते पीडितेच्या कुटूंबियांना व मित्रांमध्ये व्हारयल करण्याची धमकी दिली.
 

मैत्रीचा गैरफायदा घेत केले धक्कादायक कृत्य

जावेद युनूस शेख (२४, रा. याजगार मंजिल, लोणकरमळा, जयभवानी रोड, उपनगर) असे संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित पीडितेच्या ओळखीचा असून, या मैत्रीचा गैरफायदा घेत संशयिताने पीडितेला राणेनगर परिसरातील हॉटेल चंद्रलोक येथे नेले आणि जबरदस्तीने बलात्कार केला. पीडितेने प्रतिकार केला असता संशयिताने मारहाण केली. तसेच संशयिताने पीडितेच्या नकळत फोटो व व्हीडिओ काढून ते पीडितेच्या कुटूंबियांना व मित्रांमध्ये व्हारयल करण्याची धमकी देत पीडितेकडून ७० हजार रुपये घेतले. दरम्यान, गेल्या १ तारखेला संशयिताने पीडितेला दुपारी नाशिकरोडच्या मुक्तीधाम परिसरातील लॉजवर नेऊन पुन्हा बलात्कार केला. सदरचा प्रकार २०१४ पासून सुरू आहे. याप्रकरणी संशयिताला अटक केली असून, उपनगर पोलिसात बलात्कारासह खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एकतर्फी प्रेमातून त्रास
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी संशयिताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोनू सोमनाथ मागभाव (२२, रा. वैद्य मळा, संभाजी चौक, उंटवाडी रोड) असे संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित सोनू याने अल्पवयीन पीडित मुलीचा सतत पाठलाग करून प्रेम करण्यासाठी धमकावले. पीडितेने नकार दिला असता, संशयिताने स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी देत तसा प्रयत्नही केला. त्यामुळे पीडितेला मानसिक त्रास होऊन तिला जगणे मुश्‍किल केले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात पोस्कोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक निरीक्षक साजिद मन्सुरी हे तपास करीत आहेत.

संशयिताला अटक : उपनगर पोलिसात बलात्कारासह खंडणीचा गुन्हा

उपनगर परिसरातील महिलेशी असलेल्या मैत्रीचा गैरफायदा घेत जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच, नकळत फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करून बदनामीची धमकी देत वारंवार शारीरिक संबंध ठेवले आणि ७० हजार रुपयेही घेतल्याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

SCROLL FOR NEXT