ed esakal
नाशिक

मी ‘ईडी’ आयुक्त बोलतोय....‘ईडी’च्या नावाचा गैरफायदा घेत मागितली खंडणी!

‘ईडी’च्या नावाने भल्याभल्यांना घाम फुटतो. याचाच गैरफायदा घेतल्याचा गंभीर प्रकार समोर

विनोद बेदरकर

नाशिक : तुमच्या चार ते पाच फायली आम्हाला प्राप्त झाल्या आहेत, मी ‘ईडी’ (Enforcement Directorate) (सक्त वसुली संचालनालय) आयुक्त बोलतोय..' असा फोन आला. अर्थातच ‘ईडी’च्या नावाने भल्याभल्यांना घाम फुटतो. याचाच गैरफायदा घेत एकाने (Ransom) धमकावण्याचा प्रकार शुक्रवारी (ता. ७) केला. (crime)

मी ‘ईडी’ आयुक्त बोलतोय....

राजकीय नेत्यांवरील धडक कारवाईमुळे ‘ईडी’ अर्थात, सक्त वसुली संचालनालय ही भ्रष्टाचारविरोधी तपास संस्था चर्चेत आहे. ‘ईडी’च्या नावाने भल्याभल्यांना घाम फुटतो. याचाच गैरफायदा घेत एकाने बाजार समितीतील ज्येष्ठ संचालक दिलीप थेटे यांना धमकावण्याचा प्रकार शुक्रवारी (ता. ७) केला. ‘ईडी’चा हा तोतया अधिकारी असल्याचे त्याच्या संभाषणावरून लक्षात आल्यानंतर शनिवारी श्री. थेटे यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. संशयिताने थेटे यांना व्यवहारराच्या अनुषंगाने चार फायली आल्या असून, आता काही वेळातच आर्थिक गुन्हे शाखेकडून तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. हा गुन्हा जर दाखल होऊ द्यायचा नसेल, तर काही देवाणघेवाण करून हे प्रकरण येथेच थांबवता येईल, असे सांगितल्याचे थेटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

खंडणी वसुलीसाठी धमकावले

थेटे यांनी त्याच्याकडे थोडा वेळ मागून याबाबत पुढे काय करायचे ते कळवितो, असे त्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा काही वेळाने थेटे यांनी त्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता त्या तोतया ‘ईडी’ अधिकाऱ्याने थेटे यांच्याकडून घर, जमीन, कुटुंबाबाबत सर्व माहिती विचारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. खोटी शासकीय अधिकारी अशी ओळख सांगून तोतयागिरी करून ठकबाजी करण्याचा प्रयत्न करीत खंडणी मागितल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह खंडणी वसुलीसाठी धमकावल्याबद्दल गुन्हा दाखल केला.

सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

तुमच्या चार ते पाच फायली आम्हाला प्राप्त झाल्या आहेत, मी ‘ईडी’ (सक्त वसुली संचालनालय) आयुक्त बोलतोय..' असा फोन करून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील ज्येष्ठ संचालक दिलीप थेटे यांच्याकडून खंडणी वसुलीचा प्रयत्न झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.८) गुन्हा दाखल झाला.

अमरावतीत धागेदोरे

शहरातील काही शासकीय अधिकारी तसेच राजकीय नेत्यांना काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे धमकवल्याची चर्चा सुरू आहे. याप्रकरणी आता सायबर पोलिसांनी मोबाईल क्रमांकाद्वारे तांत्रिक विश्लेषण करण्यास सुरवात केली आहे. त्याचे धागेदोरे विदर्भाकडे सरकले असून, ते अमरावतीपर्यंत येऊन थांबल्याची चर्चा पोलिस वर्तुळात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT