Pair of bullocks
Pair of bullocks esakal
नाशिक

Nashik : रावसाहेब मोगलांचा बैलगाडा ठरला देशात अव्वल!

भारत मोगल

कसबे सुकेणे (जि. नाशिक) : पुण्यातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीत (Bullock Cart Race) मौजे सुकेणे येथील रावसाहेब त्र्यंबक मोगल यांचा बैलगाडा अव्वल ठरला आहे. त्यांच्यासोबत जुगलबंदीसाठी असलेला पुणे येथील बाळासाहेब जवळेकर व बंधू यांच्या बैलासह पुण्यामध्ये ४०० फूट अंतर असलेला घाटमाथा चढास्वरुपातील वळण ११.२४ सेकंदात पार करत घाटाचा राजा हा किताब मिळवत देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यतीत अंतिम फेरीतील जेसीबी मशीन (JCB) या बक्षीसासह व मोटारसायकल (Motorcycle) पटकावली आहे.(Raosaheb Mogals bullock cart became the top in the country Nashik News)

पुण्यातील पिंपरी चिंचवडजवळील जाधववाडी येथे मंगळवारी (ता.३१) सायंकाळी उशिरा अंतिम शर्यत झाली. यामध्ये ११.२४ घाटाचा राजा जेसीबी मशीन विजेता हा बहुमान नाशिक जिल्हातील मौजे सुकेणे येथील रावसाहेब त्र्यंबक मोगल यांचा नाशिक जिल्ह्यातील फायनल सम्राट म्हणून प्रसिद्ध असलेला गुरु बैल व बाळासाहेब जवळेकर यांचा हिंदकेसरी सम्राट असलेला मन्या बैल या दोघांच्या बैलगाड्याला मिळाला.

पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांनी या शर्यतीचे आयोजन केले होते. संपूर्ण भारतातून या स्पर्धेसाठी स्पर्धक दाखल झाले होते. जिल्ह्यातील मौजे सुकेणेचे रावसाहेब त्र्यंबक मोगल यांच्या बैलगाडीने अंतिम फेरी गाठत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले होते. अंतिम स्पर्धेतही अव्वल क्रमांक मारत सामायिक जेसीबी मशीनचे मानकरी ठरत मोटारसायकलही बक्षीस पटकावले. ही स्पर्धा २७ ते ३० मे या काळात झाली, जवळपास १२०० बैलजोड्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. अंतिम स्पर्धेत ७० बैलजोड्यांमधून अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली. देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे येथील रावसाहेब मोगल व पुण्याचे बाळासाहेब जवळेकर व बंधू यांच्या बैलजोडीने जिंकल्याने मौजे सुकेणे सह संपूर्ण नाशिक जिल्ह्य़ात सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.

"कोरोनाकाळात बैलगाडा शर्यत बंद होती, मात्र आता बंदी उठवल्याने या स्पर्धा सुरू झाल्या आहेत. स्पर्धेसाठी आमच्या गुरु बैलाची आम्ही दोन महिन्यापासून तयारी सुरू केली होती, अंतिम स्पर्धा जिंकल्याने आम्हाला आमच्या गुरुचा खूप अभिमान आहे. आमच्या गुरूने मौजे सुकेणे गावाचे नाव रोशन केल्याने आम्हाला त्याचा मोठा अभिमान आहे."

- प्रशांत मोगल, शेतकरी पुत्र, मौजे सुकेणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT