rape case esakal
नाशिक

Nashik Crime News : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर तब्बल दोन वर्ष अत्याचार केल्यानंतर ऐनवेळी जातिवाचक भाष्य करीत संशयिताने लग्नास टाळाटाळ केल्याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून एकावर गुन्हा दाखल झाला आहे. (Rape by luring marriage Nashik Crime News)

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

अंबड पोलिस ठाण्यात बलात्कार, अ‍ॅट्रोसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. विशाल जगदीश परदेशी (३४, रा. पवारवाडी, प्रगतीनगर, जेल रोड) असे संशयिताचे नाव आहे.

संशयित आणि तरुणीची ओळख २०२० पासून असून, त्यांच्यातील मैत्री कालांतराने प्रेमात बदलली. युवतीला विवाहाचे आमिष दाखवीत तब्बल दोन वर्ष अत्याचार केला. नोव्हेंबर २०२२ पर्यंत हा प्रकार सुरू होता.

मात्र, दोन वर्ष उलटूनही संशयित लग्न करीत नसल्याने तरुणीने त्याच्याकडे तगादा लावला. लग्न केले तर समाजात बदनामी होईल, असे म्हणत त्याने मुलीस जातिवाचक भाष्य केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलिसात धाव घेतली. सहाय्यक निरीक्षक सोहेल शेख अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१० नोव्हेंबरनंतर आचारसंहिता? राज्य निवडणूक आयोगाची उद्या बैठक; राज्यातील विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली जाणार ‘या’ मुद्द्यांची माहिती

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा कोबीचे खुसखुशीत थालीपीठ, सोपी आहे रेसिपी

मोठी बातमी! आता ‘टीईटी’ उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनाच पदोन्नती; नोकरी टिकविण्यासाठीही आता शिक्षकांना ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावीच लागणार, वाचा...

आजचे राशिभविष्य - 29 ऑक्टोबर 2025

ड्रोन तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT