Raped on Minor girl esakal
नाशिक

Nashik : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला सश्रम कारावास

नरेश हाळणोर

नाशिक : सार्वजनिक शौचालयात (public toilet) नेवून अल्पवयीन चिमुरडीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी नराधामास न्यायालयाने दहा हजार रुपये दंड व दहा वर्ष सश्रम कारावासाची (rigorous imprisonment) शिक्षा सुनावली. सदरची घटना २०१७ मध्ये देवळाली गावातील बकालवाडी परिसरात घडली होती. रवींद्र बौहलसिंग बहोत (वय ३६, रा.गांधीधाम, देवळाली गाव) असे आरोपीचे नाव आहे. (rape of minor girl Accused sentenced to rigorous imprisonment Nashik crime News)

देवळालगाव परिसरात राहणारी ९ वर्षांची अल्पवयीन मुलगी १३ ऑक्टोबर २०१७ रोजी दुपारच्या सुमारास बकालवाडी परिसरातील सार्वजनिक शौचालयात गेली होती. ती एकटी असल्याची संधी साधत आरोपी रवींद्र याने तिला तोंड दाबून शौचालयात ओढत नेले व दोरीने हात बांधून तिच्यावर बलात्कार केला होता. यावेळी त्याने याबाबत वाच्यता केल्यास तुझ्या आई- वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. पीडित मुलीने घर गाठले आणि आईला घटनेची माहिती दिली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात बलात्कारासह, बालकांचे लैंगिक अत्याचार अधिनियम व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरील गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक एस.डी. तेली यांनी करीत आरोपी रवींद्र यास अटक केली व न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सदरचा खटला पोक्सो न्यायालयाचे न्या. एस.डी. देशमुख यांच्या कोर्टात चालला. अ‍ॅड. दीपशिखा भिडे यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज पाहताना दहा साक्षीदार तपासले. न्यायालयाने आरोपीस दहा वर्ष सश्रम कारावास आणि १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Rahul Dravid Son: ४८ ब्राऊंड्री अन् ४५९ धावा... द्रविडच्या धाकट्या लेकाच्या कारनामा; KSCA कडून झाला मोठा सन्मान

पालघरमधील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर! डहाणूत सामान्य, जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला तर पालघरमध्ये ओबीसीचे आरक्षण

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT