Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : शहरात वाहनचोरट्यांचा सुळसुळाट; कारसह 5 दुचाकींची चोरी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गंगापूर रोड परिसरातून सात लाखांची क्रेटा कारसह शहर परिसरात अज्ञात चोरट्यांनी पाच दुचाकी चोरून नेल्या. सोनसाखळी चोरट्यांचा शहरात धुडगूस सुरू असतानाच दुचाकी चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. तर, दुसरीकडे पोलिसांची रात्रीची गस्ती पथके करतात काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. (rash of vehicle thefts in city Theft of 5 bikes along with car Nashik Latest Crime News)

प्रशांत दिनकर पाटील (रा. गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची ७ लाख रुपयांची पांढऱ्या रंगाची क्रेटा कार (एमएच- १५- जीएल- ५८५८) रविवारी (ता. १६) मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. भगवंत नामदेव अष्टेकर (रा. नांदूर नाका) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची दुचाकी (एमएच- १५- डीक्यू- ८४१२) १३ ऑक्टोबरला गोदाघाटावरील यशवंत महाराज पटांगण येथून चोरीला नेली.

याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सत्तार मेहमूद सय्यद (रा. तलाववाडी, भद्रकाली) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची ॲक्टिव्हा मोपेड (एमएच- १५- एफपी- २१८४) सारडा सर्कल येथून ५ ऑक्टोबरला मध्यरात्री चोरी झाली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल आहे. महादेव हरिभाऊ जंजाळ (रा. चुंचाळे शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची दुचाकी (एमएच- १५- बीसी- २८३६) २७ जुलैला रात्री पार्थ हॉटेलजवळील पानटपरीपासून चोरी झाली.

याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. प्रदीप अण्णा बिडकर (रा. चुंचाळे शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी (एमएच- १५- सीएल- ९२४६) २ ऑक्टोबरला मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. धीरज कन्हैयालाल नकवाल (रा. उपनगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची बुलेट (एमएच- १५- जीझेड- ३४६२) राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून १२ ऑक्टोबरला मध्यरात्री चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune NCP BJP MLC : पुणे विधानपरिषदेच्या जागेवरुन रस्सीखेच, राष्ट्रवादी -भाजपमध्ये संघर्षाची चिन्हे; भाजप नेत्यांने आकड्यांचा खेळ मांडला

India’s Fastest Man! भारताच्या गुरविंदरवीर सिंगने १०.०९ सेकंदात पार केले १०० मीटरचे अंतर; राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धेचे तिकीट मिळवले

Mumbai Rain: पुढील काही तास महत्त्वाचे! मुंबईसह 'या' भागात कोसळणार मुसळधार, हवामान विभागाचा अलर्ट

Jalna Unseasonal Rain : कुंभार पिंपळगाव परिसरात वादळी वारे, गारांसह अवकाळी पावसाचा तडाखा

Pune Census News : पुणे महापालिकेचा जनगणना कर्मचाऱ्यांना इशारा : निष्काळजी प्रगणकांवर ‘जनगणना कायदा १९४८’ अंतर्गत कठोर कारवाईची तयारी

SCROLL FOR NEXT