Raw Mango enters the Malegaon market Decline in demand for vegetables due to Ramadan Nashik News esakal
नाशिक

मालेगावच्या बाजारात कैरी दाखल; रमजानमुळे भाजीपाल्याच्या मागणीत घट

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : येथील भाजीपाला बाजारात लवंगी मिरची, जाड मिरची, कोथिंबीर, लिंबू यांचे भाव वाढले आहेत. आवक घटल्यामुळे बाजारात लिंबू भाव खात आहे. शहरात रमजानपर्वामुळे (Ramzan Festival) भाजीपाल्याची मागणी काही प्रमाणात घटली आहे. येथील बाजारात कैरीचे आगमन झाले आहे. ३० ते ४० रुपये किलोने कैरी विकली जात आहे.

येथील बाजारात आठवड्यापासून कैरी विक्रीसाठी येत असून, किरकोळ विक्रेत्यांकडे ३० ते ४० रुपये किलोने मिळत आहे. सध्या आंध्र प्रदेशमधून येथे कैरी विक्रीसाठी येत आहे. रोज पाच ते दहा टन कैरीची आवक होत आहे. जानेवारी महिन्यात कैरीला विक्रमी भाव होता. कैरीने जानेवारीत शंभरी ओलांडली होती. गुजरात व कसमादे परिसरातील कैरी येथील बाजारात जूनच्या सुरवातीला विक्रीसाठी दाखल होईल. मृगाच्या पावसानंतर लोणचे घालण्याची प्रथा आहे. यानंतरच कैरीचा बाजार तेजीत येईल. जूनपासून मालेगावी रोज ५० ते ६० टन कैरीची विक्री होणे अपेक्षित असल्याचे कैरीचे घाऊक व्यापारी महेंद्र (बाबा) वाघ यांनी सांगितले.

रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांचे उपवास सुरू असल्याने बाजारात फळांना मागणी वाढली आहे. भाजीपाल्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली. महिन्यापासून भाजीपाल्याचे भाव कोलमडले आहेत. भाव घसरल्याने हातगाडीवरील भाजीपाला विक्रेते अन्य व्यवसायाकडे वळले आहेत. पूर्व भागातील बहुसंख्य भाजीपाला विक्रेते नान, कपडे, सुत्तरफेणी, चप्पल विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. येथे हातगाडीवर भाजीपाला विक्री करणाऱ्यांच्या संख्येतही घट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT