Nashik News : एखादी कला जोपासण्यासाठी तिच्याशी नाते असावे लागते. १९७२ ला संगीतकार म्हणून ओळख मिळाली.
नाटक, चित्रपटांसाठी अनेक गाणी केली. मालिकांमधील शीर्षकगीतांमुळे घराघरांत पोचलो, अशी भावना ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक, अभ्यासक अशोक पत्की यांनी सांगितिक प्रवास उलगडताना व्यक्त केली. (Reached homes due to serials Ashok Patki lekhak tumchya bhetila Nashik News)
गौरी कुलकर्णी यांनी अशोक पत्की यांची मुलाखत घेतली. ज्योती स्टोअर्स, शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लेखक तुमच्या भेटीला’ व्याख्यानमालेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते शनिवारी (ता. २) शंकराचार्य संकुलातील कुर्तकोटी सभागृहात झाले.
‘सकाळ’ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष ॲड. अविनाश भिडे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, शंकराचार्य न्यासचे सेक्रेटरी प्रमोद भार्गवे यांची विशेष उपस्थिती होती. ज्योती स्टोअर्सचे संचालक वसंत खैरनार यांनी स्वागत- प्रास्ताविक केले.
अशोक पत्की म्हणाले, पेटी घेण्यासाठी बहिण मीना पत्की विविध कार्यक्रम करायच्या. असे ३६ रुपये जमा झाल्यानंतर दादरला पेटी घेण्यासाठी हरी विश्वनाथ दुकानात गेलो. तेथे गेल्यावर पेटीची किंमत विचारली, त्यांनी ५० रुपये सांगितली.
माघारी फिरत असताना माझे अश्रू तरळले, त्या दुकानदाराने तुझे डोळ्यांतले अश्रूच सांगताय की तुला काहीतरी बनायचे असे सांगत पेटी ३५ रूपयांत दिली. तेथून माझा सांगितिक प्रवास सुरू झाला.
सुमन कल्याणपूर, सुरेश वाडकर, अशोक परांजपे यांच्यासोबत काम केले. त्यांनी पहिल्यांदा काम दिले तेव्हा दडपण वाटायचे. नंतर एखादे काम दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी रिझल्ट मिळायला लागला.
‘कालरात्री स्वप्नांमध्ये एक राजा आला’ हे प्रेमगीताला चाल लावल्यानंतर शब्द सुचले. ‘तू सप्त सूर माझे, तू श्वास अंतरीचा’ गाणे दीर्घकाळ लक्षात राहणारे ठरले. अभिषेकी बुवांमुळे मला नाटके मिळत गेली. नाटकांमधील टांग टिंग टिंगा, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते, यमुना जळी खेळूया खेळ कन्हय्या, अशी नाटकांमधील गीते केली.
‘आपली माणस’ ला पुरस्कार मिळाल्यानंतर पंधरा वर्षांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. आभाळ माया, वादळवाट सारख्या मालिकांचे शीर्षकगीते गाऊन त्यांनी प्रेक्षकांनी दाद मिळविली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
गोडव्याशिवाय गाणी होत नाही.
‘राधा ही बावरी’ गाण्याला ओळी देत असताना त्याची चाल खूप मोठी होती. पण हे गाणे एका रात्रीतून पूर्ण केले. सकारात्मकता आणि गोडव्याशिवाय गाणी होत नाही, असेही अशोक पत्की यांनी नमूद केले.
श्रोतेपणाची भावना पोचावी : डॉ. रनाळकर
‘सकाळ’ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर म्हणाले, लेखक तुमच्या भेटीला उपक्रमातून वाचनाची चळवळीतून सांस्कृतिक ज्ञानात भर पडत आहे. अशोक पत्की यांना सोशल मीडियावर बघणे आणि प्रत्यक्ष ऐकणे यात मोठा फरक असल्याने ही पर्वणी आहे.
सोशल माध्यमावर पीडीएफ स्वरूपात दिग्गज लेखकांची पुस्तके फॉरवर्ड होतात. या सर्व गोष्टी आभासी जगात वावरण्यासाठी फॉरवर्ड केल्या जात आहेत.
ऑनलाइनच्या जगात ऑफलाइन व्याख्यानमालेतून श्रोतेपणाची भावना ‘लेखक तुमच्या भेटीला’ उपक्रमातून पुढील पिढीपर्यंत पोचावी, असे त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.