Amit Thackeray latest marathi news esakal
नाशिक

MNS News : ‘मनसे’ची नव्याने बांधणी; अमित ठाकरे यांचे संकेत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत चैतन्य निर्माण करण्यासाठी नव्याने संघटनात्मक बांधणीचे संकेत देतानाच मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी संघटनात्मक बैठकीचा अहवाल तत्काळ पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना सादर केला जाणार असून, मनसेच्या सत्ताकाळात सामाजिक दायित्वातून तयार झालेल्या प्रकल्पांपैकी बोटोनिकल गार्डन प्रकल्प सुरु करणार असल्याचे सांगितले. (Rebuilding of MNS Hint by Amit Thackeray nashik news)

मनसेच्या संघटनात्मक बांधणीचा भाग म्हणून अमित ठाकरे मंगळवारी (ता. २८) नाशिकमध्ये आले होते. पक्षाच्या राजगड कार्यालयात प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार ईचम, महिला आघाडीच्या सुजाता डेरे, जिल्हा प्रमुख अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, ज्येष्ठ नेते सलीम शेख, पराग शिंत्रे आदींनी त्यांचे स्वागत केले.

श्री. ठाकरे यांनी दिवसभरात प्रभागनिहाय संघटनेचा आढावा घेतला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अडचणी, आगामी राजकीय गणिते, प्रभागाची सध्याची स्थिती, विकासकामांचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर सायंकाळी प्रसार माध्यमांशी औपचारीक संवाद साधला.

कार्यकर्त्यांशी संवाद वाढविण्यासाठी राज्यभर दौरे करत असल्याचे सांगून त्यांनी, त्याचाचं एक भाग म्हणून नाशिकमध्ये बैठक घेतल्याचे स्पष्ट केले. बैठकींचा अहवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सादर केला जाणार असून, गरज भासल्यास संघटनात्मक बदलाचे संकेतही ठाकरे यांनी दिले. दरम्यान, पक्षप्रमुख राज ठाकरे लवकरच नाशिकच्या दौऱ्यावर येणार असून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

बॉटीनिकल गार्डन सुरु होणार

महापालिकेत मनसेची सत्ता असताना टाटा ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक दायित्वाच्या निधीतून बोटोनिकल गार्डन साकारले. या गार्डनमध्ये बोलकी झाडे लावण्यात आली. प्रकल्पाचे उद्‌घाटन टाटा समुहाचे रतन टाटा यांच्या हस्ते झाल्यानंतर काही काळ गार्डन सुरु राहीले. परंतू, मनसेची सत्ता गेल्यानंतर बोटोनिकल गार्डन दुर्लक्षित झाले.

अद्यापही तीच अवस्था आहे. नाशिककरांच्या मनोरंजनासाठी साकारलेला हा प्रकल्प पुन्हा सुरु करण्यासाठी वनविभाग, महापालिका अधिकाऱ्यांशी आजच बोलणी झाली असून, त्यांनी लवकरच बोटोनिकल गार्डन सुरु करण्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती ठाकरे यांनी या वेळी दिली.

मनसेची घे भरारी

महापालिकेत मनसेची सत्ता आली त्यापुर्वी कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. तेच वातावरण पुन्हा निर्माण करण्यासाठी व्युहरचना आखली जाणार आहे. अमित ठाकरे यांचा रोड शो, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद यानिमिताने होतील. त्याचबरोबर मनसेच्या सत्ता काळातील सुरु झालेले, परंतू सध्या दुरवस्था झालेल्या प्रकल्पांना उर्जितावस्था प्राप्त करून दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT