recruitment esakal
नाशिक

जून महिन्यात वैद्यकीय विभागात भरती! सहाशे पदे भरणार

विक्रांत मते

नाशिक : पहिल्या व दुसऱ्या कोरोना लाटेचा (corona first and second wave) सामना करणाऱ्या महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला (medical department) शासनाने अत्यावश्‍यक पदे भरण्यास मंजुरी दिल्याने दिलासा मिळाला आहे. (Recruitment-in-medical-department-in-month-of-June)

जून महिन्यात वैद्यकीय विभागात भरती

नाशिक महापालिकेत अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात विविध संवर्गातील पदे रिक्त आहेत. जुन्या ‘क’ वर्ग आकृतिबंधानुसार ७०९० पदे मंजूर करण्यात आली होती. त्यातील दोन हजार आठशे पदे सध्या रिक्त असून, उर्वरित ४८०० पदांवर काम करताना कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कामाचा ताण निर्माण झाला आहे. जूनपासून वैद्यकीय विभागातील डॉक्टर्स, नर्सेससह विविध सहाशे पदे भरण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या गृहीत धरून महापालिकेच्या प्रशासन विभागाने नवीन आकृतिबंध राज्य शासनाकडे सादर केला आहे. त्यामध्ये एकूण चौदा हजार पदे आहेत. परंतु, अद्यापही शासनाने या आकृतिबंधाला मंजुरी दिली नाही.

एकूण ६०० रिक्त जागा भरल्या जाणार

कोरोना पहिला लाटेचा सामना करताना आरोग्य व वैद्यकीय सेवेवर मोठा ताण निर्माण झाला. त्यामुळे महापालिकेने अत्यावश्यक सेवेतील पदे भरण्याची मागणी केली होती. शासनाने त्यावेळीदेखील कायमस्वरूपी पदे भरण्याऐवजी मानधनावर पदे भरण्यास मान्यता दिली. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी, स्टाफ, नर्सेस, वॉर्डबॉय, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रेडिओलॉजिस्ट, अशा विविध पदांसाठी मानधनावर उमेदवारांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या. मात्र, वैद्यकीय विभागाची ही तात्पुरती गरज भागली. दीड महिन्यापूर्वी राज्य शासनाने वैद्यकीय व अग्निशमन विभागातील पदे भरण्यास मंजुरी दिली. त्यानुसार तिसऱ्या लाटेचा विचार करताना महापालिकेने मानधनावर पदे भरण्याऐवजी आता शासनाने दिलेल्या मंजुरीनुसार थेट नियुक्ती करण्यासाठी पावले उचलली आहेत. नव्या आकृतिबंधातील वैद्यकीय विभागाच्या एकूण ६०० रिक्त जागा भरल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

कोरोना तिसरी लाट लक्षात घेऊन वैद्यकीय विभागातील पदे तातडीने भरणे गरजेचे आहे. त्यानुसार वैद्यकीय विभागातील जवळपास सहाशे पदे भरण्याची प्रक्रिया जून महिन्यापासून सुरु केली जाणार आहे. - कैलास जाधव, आयुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT