Teacher Recruitment esakal
नाशिक

Teacher Recruitment : आदिवासी विद्यार्थी राष्ट्रीय शिक्षण संस्थेतर्फे शिक्षक अन कर्मचारी भरती; यावर करा अर्ज...

सकाळ वृत्तसेवा

Teacher Recruitment : आदिवासी विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेकडून (एनईएसटीएस) शिक्षक आणि बिगर शिक्षक कर्मचाऱ्यांची चार हजार ६२ पदे भरण्यासाठी ईएमआरएस स्टाफ सिलेक्शन परीक्षेकरिता नेस्टरने अधिसूचना जारी केली आहे.

केंद्रीय आदिवासी मंत्रालयांतर्गतची शिक्षण संस्था स्वायत्त आहे. (Recruitment of 4 thousand 62 teachers and staff by National Institute of Education for Tribal Students nashik news)

‘ईएमआरएस’मध्ये दर्जेदार मनुष्यबळ नियुक्त करून ‘ईएमआरएस’च्या शैक्षणिक दर्जात सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी अर्जाची प्रक्रिया ३० जूनपासून सुरू झाली. ‘सीबीएसई’च्या समन्वयाने नेस्ट्सच्या परीक्षेचे ओएमआर आधारित (पेन-पेपर) प्रकाराने ही भरती केली जाणार आहे.

भरती होणाऱ्या पदांची संख्या अशी : प्राचार्य- ३०३, पीजीटी- दोन हजार २६६, लेखापाल- ३६१, कनिष्ठ सहाय्यक सचिव- ७५९, लॅब अटेंडंट- ३७३.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रत्येक पदासाठी ऑनलाइन अर्जाची सविस्तर प्रक्रिया, पात्रतेचे निकष आणि अभ्यासक्रमासह इतर सर्व तपशील emrs.tribal.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

राज्ये तथा केंद्रशासित प्रदेशांमधील ‘ईएमआरएस’मधील रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. अर्ज स्वीकारण्यासाठी हे पोर्टल ३१ जुलैपर्यंत खुले राहील.

पन्नास टक्के अथवा त्यापेक्षा अधिक अथवा २० हजार अथवा त्यापेक्षा अधिक आदिवासी असलेल्या तालुक्यांमध्ये आदिवासी समुदायाच्या लोकांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी मंत्रालयाचा ईएमआरएस हा एक अग्रणी उपक्रम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

SCROLL FOR NEXT