NMC Nashik News esakal
नाशिक

Nashik News: मनपाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रायोजकांच्या माध्यमातून पुनर्विकास

शहराच्या विकासासाठी नाशिक महापालिकेने सिंहस्थअंतर्गत विकास आराखडा तयार करण्याबरोबरच पर्यटन विभागाकडून ४० कोटी रुपयांचा निधी मागणी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: शहराच्या विकासासाठी नाशिक महापालिकेने सिंहस्थअंतर्गत विकास आराखडा तयार करण्याबरोबरच पर्यटन विभागाकडून ४० कोटी रुपयांचा निधी मागणी केली आहे. (Redevelopment of Municipal Ambitious Project through sponsors nashik News)

असे असले तरी त्या व्यतिरिक्त दादासाहेब फाळके स्मारक, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण तारांगण, निमानी व नाशिक रोड बसस्थानक शाळांच्या इमारती, स्वर्गीय प्रमोद महाजन उद्यान हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रायोजकांच्या माध्यमातून पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोजकांच्या माध्यमातून एकूण २३५ विकासकामे प्रस्तावित आहे, त्यातील १६७ कामे पूर्ण झाली आहेत.

महापालिकेला प्राप्त होणाऱ्या उत्पन्नापैकी बहुतांश उत्पन्न हे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होते. त्याचबरोबर एकूण उत्पन्नाच्या जवळपास ४३ टक्के हा बांधव स्वरूपाचा खर्च आहे. रस्ते आरोग्य शिक्षण पाणी या महत्त्वाच्या सुविधा नागरिकांना पुरवितानाच प्रकल्पांची उभारणी शहर सौंदर्यीकरण तसेच देखभाल- दुरुस्तीदेखील महापालिकेला करावी लागते. प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा विचार करता सद्यःस्थितीत महापालिकेला प्रकल्पांचे पुनर्विकास परवडणारे नाही.

त्यामुळे प्रायोजकांच्या माध्यमातून पुनर्विकास करण्याचे नियोजन आहे. शासनाने यासंदर्भात नवीन धोरण आखले आहे. त्यात शहरातील व्यापारी, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक तसेच संघटनांच्या माध्यमातून निधी उभारता येऊ शकतो. त्याच अनुषंगाने महापालिकेने निर्णय घेतला आहे, अशी माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली.

प्रायोजकांच्या माध्यमातून विकासकामांची सद्यःस्थिती

- एकूण मंजूर प्रस्ताव- २३५

- कामे पूर्ण झालेली ठिकाणे - १६७

- सुरू असलेली कामे- १९

- नवीन कार्यवाहीतील ठिकाणे - ४९

- नवीन प्रस्तावित महत्त्वपूर्ण कामे - ३१

पुनर्विकासाचे नवीन प्रस्ताव

- स्व. प्रमोद महाजन उद्यान.

- निमाणी व नाशिक रोड बसस्थानक नूतनीकरण

- शाळा, अंगणवाडी इमारतींचे सुशोभीकरण.

- चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक.

- स्व. यशवंतराव चव्हाण तारांगण पुनर्विकास व संचलन.

- पूल, चौक, कारंजे, दुभाजक, फुटपाथ सुशोभीकरण.

- आरक्षित जागेवर क्रीडांगण, होळकर पुलावरील वॉल कर्टन दुरुस्ती.

- वाहतूक नियमनासाठी उपाययोजना.

- नाशिकरोडचा सावरकर उड्डाणपुलाचे सुशोभीकरण.

- सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणी, सौर पॅनल बसविणे.

- गोदाघाट नूतनीकरण व सुशोभीकरण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT