nashik nmc esakal
नाशिक

Nashik : मनपा प्रशासकीय खर्चात कपात

विनोद बेदरकर

नाशिक : प्रशासकीय राजवट, पदाधिकारी वाहनाचा इंधन खर्चातील (Fuel Expenditure) बचत, केबिन वीज बिलात (electricity bill) बचत यासोबत उत्पन्नातील वाढ यामुळे महापालिकेच्या (NMC) प्रशासकीय खर्च कमी होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत ६ टक्के कमी होत आहे. (Reduction in Municipal Administrative Expenditure Nashik news)

मागील वर्षी आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने महापालिकेत नोकर भरती होऊ शकली नव्हती. मात्र, यंदा महापालिकेच्या उत्पन्नात समाधानकारक वाढ होत असताना प्रशासकीय खर्च कमी झाल्यामुळे २०२२-२३- आर्थिक वर्षात आस्थापना खर्च कमी येण्याची शक्यता आहे. महापालिकेत २०१९- २० आर्थिक वर्षात २९ टक्के आस्थापना खर्च होता, तर २०२०-२०२१ वर्षात ३८ टक्के होता. मागील वर्षी ३८ टक्के खर्चामुळे नोकरभरती प्रस्ताव रखडला होता. मात्र, आता १४ मार्चपासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. यामुळे पदाधिकाऱ्यांचा वाहन, इंधनासह विविध प्रकारच्या सुविधा कमी झाल्या आहेत. पदाधिकारी कार्यालयातील विद्युत बिल त्याचप्रमाणे गाड्यांच्या इंधन आदींत बचत झाली आहे. वसुलीकडे विशेष लक्ष दिल्याने पाणी व घरपट्टी वसुली वाढली आहे. यामुळे ३१ मार्च आस्थापना खर्चाचा आकडा कमी राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde:'विधान परिषदेत शशिकांत शिंदेंचा पेन ड्राइव्ह बॉम्ब'; कोरेगावच्या पोलिस अधिकाऱ्याची संभाषण क्लिपने उडाली खळबळ..

Mumbai: हजारो कुटुंबांना दिलासा देणारा निर्णय! अवाजवी मेंटेनन्स आणि वाढीव वीजबिलावर लगाम लागणार; सरकारची मोठी घोषणा

Sydney Shooting : ऑस्ट्रेलियातील सिडनीत दहशतवादी हल्ला? दोन अज्ञातांकडून अंदाधुंद गोळीबार; १० जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update: ओबीसी आंदोलक अँड.मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला, अज्ञातांकडून दगडफेक

Crime: आधी अमानुष मारहाण; नंतर जीवे मारण्याची धमकी, शिक्षकाचं ७ वीच्या विद्यार्थिनीसोबत धक्कादायक कृत्य, कारण काय?

SCROLL FOR NEXT