Rabi Season  esakal
नाशिक

Nashik Rain Crisis: जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात 5 हजार हेक्टरची घट! गहू, कांदा पिकाचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Crisis : यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरिपापाठोपाठ आता रब्बीलाही फटका बसण्याची शक्यता आहे. यंदा रब्बीच्या क्षेत्रात पाच हजार हेक्टर क्षेत्र घटेल.

पुरेसे पाणी नसल्याने दुष्काळामुळे गहू आणि कांद्याचे क्षेत्रही कमी होऊ शकते. उपलब्ध पाण्यातून ज्वारीसह हरभऱ्याचे क्षेत्र मात्र वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविला जात आहे. (Reduction of 5 thousand hectares in Rabi area in district Wheat onion crop production expected to decrease nashik)

जिल्ह्यात पाऊस कमी झालेला आहे. त्यामुळे छोटे-मोठे तलाव, नाले वाहू शकले नाहीत. परिणामी, पाण्याची पातळी अपेक्षित वाढलेली नाही. पुरेसा पाऊस नसल्याने खरिपावर परिणाम झाला होता. आता रब्बी हंगामावर त्याचा परिणाम होणार आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्यात एक लाख १८ हजार ४४ हेक्टर क्षेत्र रब्बीसाठी निश्चित केले होते. यात एक लाख १५ हजार २१२ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्षात रब्बीच्या पेरण्या झाल्या होत्या. यंदा रब्बीसाठी एक लाख १४ हजार २४९ हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.

प्रत्यक्षात नेमक्या किती पेरण्या होतात, हे अद्याप निश्चित नाही. परंतु, उद्दिष्टात पाच हजार हेक्टरची घट झाली आहे.

निश्चित केलेल्या उद्दिष्टात ज्वारी दोन हजार २७१, गहू ५८ हजार ७९३, हरभरा ३४ हजार १९६, मका सात हजार ३९२ हेक्टरवर पेरणीचा अंदाज आहे. उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊनच शेतकरी रब्बीचे नियोजन करीत असतात.

यात गव्हाला चार ते पाच पाणी लागतात. मात्र, पुरेसे पाणी नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी एक-दोन पाण्यावर येणाऱ्या ज्वारी व हरभरा पिकांना प्राधान्य दिले. तसेच, पाण्याच्याच संभाव्य समस्येमुळे कांदा लागवडीसाठीही शेतकरी धजावताना दिसत नाही.

उलट ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी आहे, त्यांना उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असेच शेतकरी कांद्यासाठी लगबग करताना दिसत आहेत.

४२ हजार क्विंटल बियाणे मंजूर

रब्बी हंगामासाठी ४२ हजार ७६ क्विंटल बियाण्यांची मागणी केली होती. ती मंजूर झाली. यात ज्वारी चार हजार २१३ क्विंटल, गहू ६५ हजार ४७६ क्विंटल, हरभरा ३१ हजार १९९ क्विंटल, मका १३ हजार ३६१ क्विंटल यांचा समावेश आहे.

आतापर्यंत १३ हजार ३९२ क्विंटलचा पुरवठा झाला. यातून तीन हजार २८५ क्विंटल बियाण्यांची विक्री झालेली आहे.

मुबलक खतसाठा

रब्बी हंगामासाठी दोन लाख ६३ हजार टनांची मागणी केली होती. त्यापैकी दोन लाख ५५ हजार ६३ टन खतसाठा मंजूर झाला आहे. ऑक्टोबरअखेर यातील २६ हजार १७९ टन खतसाठा प्राप्त झाला.

खरीप हंगामातील (मागील) तब्बल एक लाख १५ हजार ८७८ टन खतसाठा शिल्लक आहे. २७ हजार १३७ टन खतांची आतापर्यंत विक्री झाली. त्यामुळे आजतागायत एक लाख १४ हजार ७७९ टन खतसाठा शिल्लक आहे.

"यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. शेती पाण्याच्या समस्येमुळे गहू आणि कांद्याचे क्षेत्र घटण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी आपल्याकडील उपलब्ध पाण्याचा तसेच उन्हाळी आवर्तनाचा विचार करूनच रब्बीची पिके घ्यावीत. तसेच, वेळोवेळी कृषी विभागाचे मार्गदर्शन घ्यावे." - कैलास शिरसाठ, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagarpalika Election Date: या तारखेला नगरपालिकेची झुंज! स्थानिक स्वराज्यच्या पहिल्या टप्प्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, Time Table बघा अन् लागा तयारीला...

Duplicate Voters List : दुबार मतदाराच्या नावापुढे डबल स्टार, नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आयोगाने उचलले मोठे पाऊल, कशी घेणार दक्षता ?

Latest Marathi News Live Update : 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत होणार 'या' अभिनेत्याची एंट्री; प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षकांनीच सांगितलं नाव

Ganesh Naik : १५०० बिबट वनतारामध्ये स्थलांतरित व १००० पिंजरे खरेदीसाठी १० कोटी रुपये निधी मंजूर करण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT