Fertilizers Distribution by Dadaji Bhuse
Fertilizers Distribution by Dadaji Bhuse esakal
नाशिक

बांधावर खते मिळण्यासाठी नोंदणी करा : कृषीमंत्री दादा भुसेंचे आवाहन

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शेतकरी बांधवांना बचत गट व विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमार्फत (Cooperative Society) एकाच वेळी खते, बियाणे व कीटकनाशके (Fertilizers, seeds and pesticides) बांधावर उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी गावातील शेतकरी बचत गट व विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये खतांची मागणी करण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांनी केले आहे. कृषी विभाग व आरसीएफ कंपनीच्या वतीने शेतकरी बांधवांना एकत्रपणे बांधावर खते वाटपाचा शुभारंभ श्री. भुसे यांच्या हस्ते सोमवारी (ता. २३) येथील शासकीय विश्रामगृहावर झाला. त्यावेळी ते बोलत होते. (Register to get fertilizer on field Appeal of Agriculture Minister Dada Bhuse Nashik News)

तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, भास्कर जाधव, पंचायत समिती कृषी अधिकारी संदीप पवार, मंडळ कृषी अधिकारी भाऊसाहेब आढाव, संदीप गलांडे, राहुल जाधव, दीपक मालपुरे, भगवान मालपुरे, आरसीएफ कंपनीचे विपणन अधिकारी बजरंग कापसे, विशाल सोनवलकर, विनोद जाधव, मनोहर बच्छाव आदी उपस्थित होते.

श्री. भुसे म्हणाले की, सध्या शेती विषयक परिस्थिती कठीण असली तरी शेतकरी बांधव अतिशय परिश्रमपूर्वक काम करत आहे. हे काम करतांना शेतकऱ्यांना खते, बियाणे, कीटकनाशके व निविष्ठांची यांची आवश्यकता असते. शेतकरी बांधवांनी जर एकत्रितपणे खते, बियाणे व कीटकनाशके यांची खरेदी केली तर त्यांना शेताच्या बांधावर ते एकाच वेळी उपलब्ध झाल्याने त्याचा फायदा सर्वांना होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी बचत गट व विविध कार्यकारी सहकारी संस्थाकडे आपली मागणी नोंदवावी, असे केल्यास कृषी विभागांतर्गत खतांचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून पुरेशा प्रमाणावर साठा उपलब्ध करून देता येणार आहे. शेतकऱ्यांनी खतांची मागणी नोंदविल्यास कृषी विभागाने खते, बियाणे व कीटकनाशके उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचनाही त्यांनी या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT