relatives decided to cremate using cow dung nashik news esakal
नाशिक

Nashik News : चला जपू या निसर्ग संवर्धनाचा वसा! स्मशानात प्रथमच पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सुरगाणा शहरात उद्धव रामचंद्र मुसळे (वय ७८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडे नसल्याने नातेवाइकांना चिंता सतावत होती.

अशातच देवळा तालुक्यातील कनकापूर येथील सोन श्याम गोसंवर्धन व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेमार्फत गोवऱ्या जाळून अंत्यसंस्कार अंतिम संस्कार सेवा ग्रुप कसमादेमार्फत करण्यात येतात. (relatives decided to cremate using cow dung nashik news)

गोशाळेचे संचालक भाऊसाहेब शिंदे यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्यांनी तत्काळ गोवऱ्या पाठवून अंतिम संस्कार केले. तालुक्यात सुरू असलेल्या वृक्षतोडीमुळे सागवान, खैर, तसेच इतर लाकूड संपुष्टात आले आहेत.

अंत्यसंस्काराकरिता लाकूड मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे नातेवाइकांनी गोवऱ्या वापरून अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. तालुक्यात प्रथमच गोवऱ्या वापरून अंत्यसंस्कार केले आहेत. लाकडांना पर्याय म्हणून या निर्णयाकडे बघितले जाते आहे.

गोशाळेचे संचालक शिंदे यांनी सांगितले, की गोपालनाबरोबरच वृक्षसंवर्धन, प्रदूषणमुक्त अंत्यसंस्काराकरिता गोवऱ्या वापरल्याने निसर्गाचे संवर्धन तर होतेच त्याचबरोबर वृक्षतोड करावी लागत नसल्यामुळे निसर्गाचा समतोल राखला जातो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

देशी गायींच्या शेणाची गोवरी वापरल्याने हवेमध्ये तेवीस टक्के प्राणवायूची निर्मिती होत असते. तसेच राखेमध्ये प्राणवायूचे प्रमाण असल्याने त्या राखेचा उपयोग शेतात खत म्हणून वापरता येते. आज बरेच शेतकरी सेंद्रिय शेती करतात.

सदर उपक्रम वर्षापासून सुरू असून, पिंपळनेर, मनमाड, मालेगाव, सटाणा, देवळा, कळवण या भागात व परिसरात दोनशेपेक्षा जास्त मृतदेहांवर गोवरी वापरून अंत्यसंस्कार केले आहेत. सुमारे सव्वाशेपेक्षा जास्त गायी या गोशाळेत आहेत. भाऊसाहेब शिंदे, दत्तात्रय जाधव, सतीश देवरे, समीर पगार, भास्कर चव्हाण, किशोर शिंदे, सुनीता शिंदे शासनाचे अनुदान न घेता गोशाळा चालवीत आहेत.

"गोमय अंत्यविधी संस्कार गेल्या वर्षापासून हा पर्यावरणपूरक उपक्रम आमच्या गोशाळेतर्फे राबविण्यात येत आहे. यामुळे वृक्षांची कत्तल केली जात नाही. वृक्ष संवर्धनाबरोबरच अस्थी विसर्जन झाल्यावर राखेचा उपयोग शेतात, झाडांना खत म्हणून वापरता येते." -भाऊसाहेब शिंदे, अध्यक्ष, अंत्यसंस्कार सेवा ग्रुप, कनकापूर, देवळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

MLA Gopichand Padalkar: 'जयंत पाटील यांच्याविषयी एकही शब्द बोलणार नाही': आमदार गोपीचंद पडळकर; घायवळचे अनेक साथीदार रोहित पवारांचे मित्र

Solapur News:'जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची गरज‌'; जिल्हाधिकाऱ्यांकडून माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

Sinai River: 'कोळेगाव-आष्टे बंधाऱ्याची झाली दुर्दशा'; सीना नदीचा पूर ओसरल्यानंतरही पुलावरील वाहतूक अद्याप बंद

SCROLL FOR NEXT