Nashik News esakal
नाशिक

Nashik News : नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील 34 बंदिवानांची मुक्तता

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : देशाचा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने देशातील विशेष प्रवर्गातील बंदिवानांना विशेष माफी देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील ३४ बंदिवानांना प्रजासत्ताकदिनी शिक्षेतून माफी देत मुदतीपूर्वीच मुक्त करण्यात आले. बंदिवान सुटताच त्यांच्या नातेवाइकांनी जल्लोष करत त्यांना घरी नेले.

या योजनेंतर्गत महाराष्ट्रात सर्वांत जास्त बंदी हे नाशिक रोड कारागृहातून सोडल्याची माहिती अधीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली. कारागृहाचे अपर महासंचालक अमिताभ गुप्ता आणि औरंगाबाद मध्य विभागाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक मलवाड, वैभव अत्राम आदी उपस्थित होते. दरम्यान, सुटका झालेल्या बंदिवानांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत पाणी आले होते.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

सुटका केलेल्या बंदिवानांमध्ये पुणे, मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील बंदिवानांचा प्रामुख्याने समावेश होता. जन्मठेप, खून, बलात्कार, अमलीपदार्थ विक्री यांसारखे गंभीर गुन्हा सोडून अन्य प्रकरणात शिक्षा झालेल्यांना या वेळी सोडण्यात आले. कारागृहातील शिस्त व आचरण लक्षात घेऊन, तसेच प्रोत्साहन मिळून गुन्हेगारी जीवन सोडून सन्मानाचे जीवन जगता यावे या उद्देशाने ही सुटका केली.

अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक यांच्या शिफारशीनुसार २०३ बंदिवानांच्या सुटकेचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यांचा अभ्यास करून बंदिवानांची वर्तणूक, त्यांनी भोगलेली शिक्षा आदी लक्षात घेऊन २०३ पैकी १८९ बंदिवानांना सोडण्यास राज्यपालांकडून मान्यता देण्यात आली. सुटका करण्यापूर्वी बंदी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी समाजात पुनर्वसन सुलभ व्हावे यासाठी समुपदेशन सत्र घेण्यात आले.

६० वय पूर्ण पण ५० टक्के शिक्षा भोगली आहे त्यांची, तसेच १८ ते ६० वयोगटांतील ज्या बंदिवानांनी ६६ टक्के शिक्षा भोगली आहे आणि गरीब बंद्यांची शिक्षा पूर्ण झाली आहे परंतु दंडाची शिक्षा बाकी आहे अशांची मुदतपूर्व सुटका करण्यात आली. कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले, की या आधी १९९७ ला स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त बंदिवानांची सुटका करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaniwarwada Namaz Controversy : शनिवारवाड्याच्या वादावरून रूपाली ठोंबरेंचा खासदार मेधा कुलकर्णींसह पोलिसांना मोठा इशारा, म्हणाल्या...

Diwali 2025: दिवाळीत कमी वेळेत काढा फुलांच्या सुंदर रांगोळ्या, एका क्लिकवर पाहा खास रांगोळी डिझाइन्स

Mokhada Rain Damage : परतीचा पाऊस ही ऊठला शेतकर्याच्या मुळावर, मोखाड्यात कापणीला आलेले भात शेतातच आडवे

Uttarakhand : उत्तराखंडमध्ये आजपर्यंत 9000 एकरांहून अधिक जमीन लॅंड जिहादींकडून मुक्त : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये खाजगी बसचा अपघात, ८ जण जखमी

SCROLL FOR NEXT