Sanjay Raut  esakal
नाशिक

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांना दिलासा; जिल्हा न्यायालयाचा अंतरिम जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा

Sanjay Raut : नाशिक दौऱ्यावर असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने खा. राऊत यांना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर २३ तारखेपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करीत दिलासा दिला. (Relief for MP Sanjay Raut District Court granted interim bail nashik political news)

मुंबई नाका पोलिस ठाण्यातील हवालदार ललित केदारे (रा. बनकर मळा, पुणा रोड, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता. १२) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना, शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली होती.

या पत्रकार परिषदेमध्ये खासदार राऊत यांनी, शिंदे -फडणवीस सरकारवर टीका करताना, हे सरकार तीन महिन्यांत जाणार. हे सरकार घटनाबाह्य आहे. या सरकारने जे आदेश काढले ते सर्व बेकायदेशीर आहे.

प्रशासन आणि पोलिसांना माझे आवाहन आहे, की बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका. ते तीन महिन्यांत जाईल. बेकायदा आदेश पाळाल तर तुम्ही अडचणीत याल. न्यायालयाचा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे, असे म्हणाले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

खासदार राऊत यांच्या या वक्तव्यामुळे पोलिसांविषयी समाजात अप्रीतीची भावना निर्माण होईल. तसेच, सार्वजनिक शांतता बिघडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे याप्रकरणी खासदार राऊत यांच्याविरोधात मुंबई नाका पोलिसांत पोलिस अप्रीतीची भावना चेतवणे अधिनियम १९२२ चे कलम ३(१) सह भादंवि ५०५ (१) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी, खा. राऊत यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर मंगळवारी (ता. १६) न्या. राठी यांच्यासमोर सुनावणी झाली.

या वेळी खा. राऊत यांच्यावतीने ॲड. एम. वाय. काळे यांनी युक्तिवाद केला. त्यानुसार, न्यायालयाने खा. राऊत यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे खा. राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT