Teachers assisting contract teacher Bhanudas Shirasath. esakal
नाशिक

Nashik News : समग्र शिक्षाच्या कर्मचाऱ्याला ‘लाखा’ची मदत; माणुसकीची सेवानिवृत्ती भेट

शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होण्यासाठी २००३ ला सर्व शिक्षा अभियान सुरू करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होण्यासाठी २००३ ला सर्व शिक्षा अभियान सुरू करण्यात आले. या अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियत वयोमाननुसार निवृत्तीनंतर शासनाकडून एक रुपयाही मिळत नाही.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील समग्र शिक्षा अभियानामधील विषय तज्ज्ञ भानुदास शिरसाठ नुकतेच निवृत्त झाले. (Relief Humanitarian Retirement Gift to Samagra Shiksha Employee nashik news)

त्यांना शासनाकडून एक रुपयाही लाभ मिळाला नाही. मात्र, भानुदास शिरसाठ यांच्या मदतीला त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिक्षक धावून आले. सर्व शिक्षकांनी तब्बल एक लाख, पंचवीस हजार रुपयांची मदत केली. त्यामुळे शिरसाठ भारावून गेले. शिक्षणाचे पवित्र ज्ञान देणारे शिक्षक ज्ञानदानाबरोबरच सामाजिक भावना चांगल्या प्रकारे जोपासतात.

याचा प्रत्यय त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिक्षकांच्या माध्यमातून दिसून आला. समग्र शिक्षा अंतर्गत राज्यभरात सुमारे ६५०० अधिकारी व कर्मचारी अत्यंत कमी मानधनावर गेल्या १५ ते २० वर्षांपासून जिल्हा व तालुका स्तरावर काम करीत आहेत.

शासनाने कायम सेवेत समाविष्ट करून न घेतल्यामुळे वयाची ५८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर उपासमारीचा सामना करावा लागत आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे त्र्यंबकेश्वर गटसाधन केंद्रातील कर्मचारी भानुदास शिरसाट विषय तज्ज्ञ पदावरून वयाची ५८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्त झाले.

पेन्शन नाही, वेतन नाही, फरक नाही, इतर कोणतेही भत्ते नाही, तसेच एक मुलगा एक मुलगी, पत्नी, आई असा संसार चालविण्यासाठी कसलीही तरतूद नाही, अशा परिस्थितीत त्र्यंबकेश्वर गटातील सर्व शिक्षक, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले. त्यांनी कर्मचाऱ्यासाठी त्र्यंबकेश्वर गटाच्या शिक्षण विभागातील विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, समग्र शिक्षा अभियान कर्मचारी, शिक्षकांना ‘माणुसकीची सेवानिवृत्ती भेट’, असे आशयाचा संदेश दिला.

त्या संदेशाद्वारे भानुदास शिरसाट यांच्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या भविष्यातील उदरनिर्वाहासाठी सुमारे एक लाख पंचवीस हजारांची रक्कम जमा केली व एक नवीन आदर्श प्रस्थापित केला. ही रक्कम त्यांना धनादेशाद्वारे शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी व शिक्षक प्रतिनिधींच्या उपस्थितीत देण्यात आली. ही रक्कम मिळाल्यानंतर भानुदास शिरसाट यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT