Onion
Onion esakal
नाशिक

मुबलक जलसाठ्यामुळे रब्बीला दिलासा; उन्हाळ कांद्याची धूम शक्य

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : तालुक्यासह कसमादे भागात कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र सरासरीएवढा पाऊस झाला आहे. मालेगाव, नांदगाव व देवळा तालुक्यांत सरासरीच्या सव्वाशे ते दीडशे टक्के पाऊस झाला. केवळ चांदवड तालुक्यात अद्याप सरासरी एवढा पाऊस झालेला नाही. मुबलक पावसामुळे कसमादेतील तलाव, पाझर तलाव, धरणे, नाले, शेततळे व विहिरी तुडुंब भरल्या आहेत. पाण्याच्या उपलब्धतेमुळे आगामी रब्बी हंगाम जोरात असेल. विविध पाणीपुरवठा योजनांना वर्षअखेरपर्यंत पूरपाणी पुरू शकेल. साहजिकच कसमादेतील धरणांमधून शेतीसाठी हमखास आवर्तने मिळतील. त्यामुळे यंदाही उन्हाळी कांद्याची धूम दिसून येईल.

आगामी रब्बी हंगामाची शाश्‍वती

जून-जुलैच्या अडखळत सुरवातीनंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये दमदार पाऊस झाला. यामुळे प्रमुख धरणे ओव्हरफ्लो झाली. गिरणा-मोसमसह इतर लहान नद्या दुथडी भरून वाहिल्या. मालेगाव तालुक्यातील माळमाथ्यावर तर सरासरीच्या दीडशे ते दोनशे टक्के पाऊस झाला आहे. विहिरी तुडुंब भरल्याने आगामी रब्बी हंगामाची शाश्‍वती निर्माण झाली. सध्या गिरणा, मोसमसह इतर नद्यांना कमी प्रमाणात का होईना पूरपाणी आहे. यातून पाणीपुरवठा योजनांचे जलसाठेदेखील भरून घेण्यात आले आहेत. मालेगावसह कसमादेतील विविध पाणीपुरवठा योजनांना वर्षअखेरपर्यंत पूरपाणी पुरू शकेल. परिणामी, धरणांमधील आवर्तने नवीन वर्षातच सुरू होतील. विहिरींमध्ये असलेले पाणी व धरणांमधील जलसाठा पाहता रब्बी हंगामाबरोबरोच उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाईल. गेल्या दोन वर्षांपासून कसमादेत उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणावर पीक घेतले जात आहे.

कसमादेतील आतापर्यंतचा पाऊस (मिलिमीटर)

तालुका - पाऊस - टक्केवारी

मालेगाव - ६५४ - १२९

नांदगाव - ९८५ - १७९

चांदवड - ३५२ - ६१

कळवण - ६४७ - ९३

बागलाण - ५४८ - ९९

देवळा - ५३७ - ११०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

Aye Haye Oye Hoye Viral Song: जे गाणं ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी कानावर ठेवले हात, त्याचं ओरिजनल व्हर्जन आहे भन्नाट

Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

SCROLL FOR NEXT