Niphad Sugar Factory esakal
नाशिक

Niphad Sugar Factory : निफाड कारखानाच्या नूतनीकरणास आजपासून सुरवात

सकाळ वृत्तसेवा

निफाड (जि. नाशिक) : बारा वर्षापासून बंद असलेला निफाड सहकारी साखर कारखाना खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून बी.टी. कडलक कन्स्ट्रक्शन प्रा लिमिटेड व अष्टलक्ष्मी शुगर, इथेनॉल व एनर्जी लिमिटेड यांच्या माध्यमातून सुरू होत आहे. यासाठी शनिवारी (ता. २४) दुपारी चारला परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते कारखाना नूतनीकरणाचा शुभारंभ होत असल्याची माहिती संचालक बी.टी. कडलग यांनी दिली. (Renovation of Niphad Sugar Factory will start from today nashik News)

निफाड सहकारी साखर कारखाना सन २०१३-१४ पासून बंद पडल्याने तालुक्यातील शेतकरी, कामगार व ऊस उत्पादक यांची मोठी हेळसांड होत होती. राज्यात सर्वाधिक ऊस उत्पादनाचा परिसर असलेल्या निफाड तालुक्यात सातत्याने १० ते १५ लाख मेट्रीक टन ऊस उपलब्ध असतो. मात्र तालुक्याचा हक्काचा कारखाना बंद असल्याने येथील शेतकरी व ऊस उत्पादक कधी कारखाना सुरू होतो याची वाट बघत होते.

खासदार हेमंत गोडसे यांनी सहकाऱ्यांच्या माध्यमातून नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू केल्यानंतर बी. टी. कडलग यांच्या माध्यमातून निफाड कारखाना सुरू करीत आहे. कारखाना परिसरात सध्या सर्वच घटकांमध्ये आनंदाचे वातावरण असून शनिवारी कारखान्याच्या गेटवर विधिवत पूजा होऊन कारखाना नूतनीकरणाचा शुभारंभ होत आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कारखान्याचे माजी अध्यक्ष माणिकराव बोरस्ते तर प्रमुख प्रमुख अतिथी म्हणून माजी अध्यक्ष प्रल्हाद कराड, तानाजीराव बनकर, भागवत बोरस्ते, माजी उपाध्यक्ष हिरालाल सानप, पंडितराव सांगळे, उद्धव कुटे, लक्ष्मणराव टरले, रोहिदास कदम, आदींसह माजी संचालक उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमास तालुक्यातील ऊस उत्पादक, शेतकरी, कामगार व विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार हेमंत गोडसे, संचालक बी.टी.कडलग, सागर गोडसे, शेरझाद पटेल आदींनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT