Tree Plantation esakal
नाशिक

NMC Tree Plantation: पुणे महामार्गावरील रस्त्यातील वृक्षांचे पुनर्रोपण! 24 झाडांच्या बदल्यात 120 नवीन झाडे

सकाळ वृत्तसेवा

NMC Tree Plantation : महामार्गाचे विस्तारीकरण होऊ नये गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचाच असलेल्या नाशिक- पुणे महामार्गावरील द्वारका ते दत्तमंदिर या दरम्यानची मोठे महाकाय वृक्ष हटविण्यास महापालिकेच्या उद्यान विभागाने परवानगी दिली आहे.

मात्र, परवानगी देताना २४ झाडांच्या बदल्यात १२० नवीन झाडे लावणे बंधनकारक राहणार असून २४ पैकी नऊ वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. (Replanting of Road Trees on Pune Highway 120 new trees instead of 24 trees nashik)

द्वारका ते दत्तमंदिर या दरम्यान मोठ्या प्रमाणात वडाचे वृक्ष आहे. महामार्गाचे विस्तारीकरण करताना २०१६ मध्ये वृक्षतोडीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, वृक्षप्रेमींनी वृक्षतोडीला मोठा विरोध केला.

तेव्हापासून महामार्गावरील महाकाय वृक्ष रस्त्यांमध्ये आले आहे. रस्त्यामध्ये वृक्षांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात तर होतातच त्याशिवाय वाहतूक ठप्प होण्याची प्रकारदेखील वारंवार घडतात. वाहनांचे वेगदेखील कमी राहत असल्याने वाहतूक ठप्प होते.

त्या पार्श्वभूमीवर वृक्षांचे पुनर्रोपण करावे, अशी नागरिकांची मागणी होती. त्याअनुषंगाने महापालिकेच्या उद्यान विभागाकडे राज्य महामार्ग प्राधिकरणासह वृक्षप्रेमींनी मागणी केली होती.

रस्त्यातील एकूण वृक्षांपैकी काही धोकादायक वृक्ष तोडण्यास उद्यान विभागाने परवानगी दिली आहे. त्यात २४ वृक्ष तोडण्यास परवानगी दिली असून, ९ वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा सूचना दिल्या आहेत.

वृक्ष पुनर्रोपण बंधनकारक

२४ वृक्षांपैकी नऊ पुरातन वृक्षांचे पुनर्रोपण करण्याची अट महापालिकेने घातली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २४ झाडे तोडण्याची परवानगी मागितली.

२४ झाडे तोडायची असेल तर त्यातील ९ झाडांचे पुनर्रोपण करावे व पुनर्रोपण होणाऱ्या झाडांमध्ये ८ वड व १ मोहाचे झाड लावावे अशा सूचना दिल्या आहेत. तोडल्या जाणाऱ्या १५ वृक्षांमध्ये ९ कडुलिंबाचे, १ सिसम, १ करंज, १ आंबट चिंच, तर १ विलायती चिंचेच्या झाडाचा समावेश आहे.

"वृक्ष तोडण्याऐवजी पुनर्रोपण करणे हा चांगला पर्याय आहे. ९ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यास परवानगी देण्यात आली असून, १५ झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. ९ वृक्षांचे पुनर्रोपण व १२० नवीन झाडे लावण्याची अट घालण्यात आली."

- विवेक भदाणे उद्यान अधीक्षक महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT