replanting tress esakal
नाशिक

नाशिक : उंटवाडी उड्डाणपुलासाठी झाडांचे पुर्नरोपन

विनोद बेदरकर

नाशिक : महापालिकेकडून अडीचशे कोटी खर्चून उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांसाठी वृक्षांच्या कत्तलीबाबत विषय अजूनही सुटलेला नाही. चारशे झाडांच्या कत्तलीबाबत महापालिकेने शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे, तर प्रस्तावित उंटवाडी पुलासाठी २४ वृक्षांच्या कत्तलीनंतर त्‍यातील काही वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचे महापालिकेच्या विचाराधीन आहे.

मायको सर्कल व उंटवाडी येथे दोन उड्डाणपूल बांधणार...

महापालिका (nmc) मायको सर्कल व उंटवाडी येथे दोन उड्डाणपूल बांधणार आहेत. त्यातील उंटवाडी उड्डाणपुलासाठी २४ झाडांची कत्तल होणार आहे. मात्र, वृक्षांच्या कत्तलीविरोधात नागरिकांचा आक्रोश बघता उंटवाडी भागातील काही झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. दरम्यान, संबंधित बांधकाम कंपनीने एकावेळी दोन्ही उड्डाणपुलाचे काम होणार असल्याने एकावेळी वेगवेगळ्या निविदा निघाल्या. त्यापैकी एका उड्डाणपुलाचे काम करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदाराला महापालिकेने दिल्या आहेत. पण कंत्राटदाराला मात्र एकावेळी दोन्ही कामांच्या सुरवातीची परवानगी हवी आहे.

एकाच वेळी दोन्ही उड्डाणपुलाचे काम होणार...

त्रिमूर्ती चौकापासून होणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामात ४७५ झाडे येत असल्याने त्याविषयी महापालिकेने शासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे. शासनाकडून अजून याप्रकरणी काही सूचना आलेल्या नाहीत. मात्र उंटवाडी येथील उड्डाणपुलाचे काम निविदा घेतलेल्या कंपनीने सुरू करावे असे महापालिकेने सांगितले आहे. एकाच वेळी आपण दोन्ही उड्डाणपुलाचे काम करू, अशी भूमिका या काम पाहणाऱ्या कंपनीने म्हटले होते. यावर महापालिकेने संबधिताना सूचना दोन्ही उड्डाणपुलांचे कंत्राट एकच नसून भिन्न आहेत. एका उड्डाणपुलाच्या कामासंबंधी प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. त्यामुळे दोन्हीपैकी उंटवाडी येथील एका उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करावे. काम करताना बांधकामामध्ये जे २४ वृक्ष येत आहेत. यात त्यांचे पुनर्रोपण करावे. काहींची छाटणी करून काम सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: ब्रेकअप ही सामान्य बाब; प्रेमसंबंध तुटणे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

Maharashtra Government Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाचा जीआर; पगार वाढला, फरकही मिळणार

कधीकधी भीती वाटते... 'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णीने घेतलाय लग्नाचा निर्णय; कारण सांगत म्हणाली- आई-बाबा बीडला...

Mumbai Police Arrest 25 Bangladeshis : मुंबई पोलिसांनी सापळा रचून २५ बांगलादेशींना केली अटक ; बनावट कागदपत्रेही जप्त

SCROLL FOR NEXT