मालेगाव (जि. नाशिक) : येथील राष्ट्रीय एकात्मता चौकातून मोसमपूलमार्गे मनमाड चौफुलीच्या दिशेने वाहनातून जनावरे बेकायदेशिरपणे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती गोरक्षक मच्छिंद्र शिर्के, विलास जगताप, बहादुर परदेशी यांना मिळाली. सदर माहिती त्यांनी छावणी पोलिसांना कळविली. (Rescue of 4 animals with help of cow guards nashik Latest Marathi News)
पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या आदेशानुसार पोलिस कर्मचारी कैलास सोनवणे, महेश गवळी, योगेश वायभासे यांनी सफेद रंगाची महिंद्रा पिकअप हॉटेल निसर्गजवळ थांबविली. पोलिसांनी एक लाख १० हजार रुपये किंमतीचे जनावरे व एक लाख ४५ हजार रुपये किंमतीची पिकअप असा दोन लाख ५५ हजार रुपयाचा ऐवज जप्त केला.
छावणी पोलिस ठाण्यात विलास वाघ (रा. नामपूर, ता. बागलाण) व मुकेश मोरे (रा. वासूळ, ता. देवळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस शिपाई कैलास सोनवणे यांनी तक्रार दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.