MSRTC ST Bus
MSRTC ST Bus esakal
नाशिक

MSRTC Reservation Facility : छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी नांदगाव आगारातून आरक्षण सुविधा!

सकाळ वृत्तसेवा

MSRTC Reservation Facility : छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी नांदगाव आगारातून आरक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे यापुढे नांदगाव येथून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये ताटकळत उभे राहून प्रवास करण्याची समस्या सुटली आहे. (Reservation facility from Nandgaon msrtc depot to Chhatrapati Sambhajinagar nashik news)

मालेगाव येथून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी प्रवाशांना आरक्षणाची सुविधा आगाराकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. नांदगाव आगाराकडून छत्रपती संभाजीनगरसाठी अकरा तर वैजापूर आगाराच्या दोन आणि गंगापूर आगाराची एक अशा एकूण सतरा बस मालेगाव-छत्रपती संभाजीनगर या मार्गावर दररोज धावत असतात.

परंतु बसेसची अपुरी संख्या आणि प्रवाशांचा प्रतिसाद यामुळे अनेकदा नांदगाव येथील प्रवाशांना मालेगाव येथून सुटणाऱ्या बसेसवर अवलंबून राहावे लागते. या सर्व बसेस मालेगावच्या जुन्या बस स्थानकातून सुटत असतात.

मात्र प्रवाशांच्या गर्दीमुळे निमगाव, नांदगाव, कासारी येथील प्रवाशांना येथून पुढचा प्रवास अनेकदा अक्षरशः उभे राहून प्रवास करावा लागतो.

छत्रपती संभाजीनगर, जालना यासह मराठवाड्यातील जनतेची नांदगाव मालेगाव अशी जुनी कनेक्टिव्हिटी आहे. मालेगावहून निघालेल्या बसेस फुल होऊन येत असल्याने निमगाव नांदगाव कासारी या ठिकाणहून बसने पुढे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ताटकळत उभे राहून प्रवास करावा लागत असे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मालेगाव येथील आगराकडून नव्या व जुन्या बस स्थानकावरून एकही बस सोडली जात नसल्याचा फटका गर्दीच्या काळात नांदगावहून पुढच्या टप्प्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत असल्याच्या प्रकाराकडे डॉ. प्रभाकर पवार यांनी नांदगाव आगारातील वाहतूक नियंत्रक विनोद इप्पर यांच्याकडे याबाबतीत लक्ष वेधले.

श्री. इप्पर यांनीही विभागीय नियंत्रकाकडे आगाराला उद्भवणाऱ्या अडचणी लक्षात आणून दिल्या. त्यानंतर विभागीय नियंत्रक यांनी निमगाव, नांदगाव व कासारी येथून बसणाऱ्या प्रवाशांना आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी आपले सीट ऑनलाइन पद्धतीने आरक्षण करता येणार आहे. नांदगावतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील आता सीट आरक्षीत करता येणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT