residents of newly settled area of ​​Makhmalabad are suffering from problems nashik news esakal
नाशिक

Nashik News : चिखल तुडवतच मार्गक्रमण; मखमलाबाद परिसरातील नववसाहतीत रहिवासी समस्यांनी त्रस्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहराच्या सर्वच भागाप्रमाणे मखमलाबाद परिसरात शंभराहून अधिक रो- हाऊस व नववसाहत उभ्या राहिल्या.

या वसाहतीतील रहिवाशांनी महापालिकेचे सर्व कर भरूनही रस्ते, पाणी, उद्यान, पथदीप असा सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. (residents of newly settled area of ​​Makhmalabad are suffering from problems nashik news)

अनेक नववसाहतीत रस्तेच नसल्याने स्थानिकांना चिखल तुडवतच चालावे लागते. याबाबत संबंधितांशी संपर्क साधला असता, आर्थिक तरतूद झाल्यावर कामे करू. आपली तक्रार संबंधितांकडे पाठविली आहे, अशी उत्तरे दिली जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

मखमलाबाद शिवारात अलीकडे मानकर मळा, पसायदान कॉलनी, विद्यानगर येथे मोठ्या प्रमाणावर नववसाहत उभ्या राहिल्या आहेत. मनपाकडून विकासनिधी घेतला जातो, परंतु दुसरीकडे या वसाहती रस्ते, पथदीपासारख्या प्राथमिक सुविधांपासून वंचित आहेत. याचा ज्येष्ठांसह महिला, लहान मुले यांना मोठा मनस्ताप होतो.

चिखलामुळे अनेक दुचाकीस्वार गाड्या घसरून जखमी होत आहे. एकीकडे संपूर्ण शहराचा विकास होत असताना या नववसाहत मात्र विकासापासून वंचित आहेत. याबाबत स्थानिकांनी लेखी तसेच ऑनलाइन तक्रार नोंदविली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र निधी उपलब्ध झाल्यावर रस्त्याचे खडीकरण व अन्य कामे होतील, आपला प्रस्ताव संबंधितांकडे पाठविला आहे, एवढीच उत्तरे मिळत असल्याचे रहिवासी सांगतात. चिखलामुळे काही भागात डासांचे प्राबल्यही वाढले आहे.

"मखमलाबादचा हा परिसर अपघातप्रवण श्रेत्र झाला आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठांनाही याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे." - प्रवीण शिंदे, रहिवासी, पसायदान कॉलनी, मखमलाबाद शिवार.

"नाशिक महापालिकेचे सर्व प्रकारचे कर भरून घराचा ताबा घेतला. परंतु रस्ते, पथदीप, मुलांच्या खेळण्यासाठी गार्डन अशा कुठल्याही प्राथमिक सुविधा नाहीत." - प्रकाश प्रजापती, रहिवासी,मखमलाबाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT