leopard esakal
नाशिक

Nashik Leopard News: पालखेडवासीयांची बिबट्यांनी उडविली झोप; आतापर्यंत 10 जनावरांवर हल्ला

पालखेड बंधारा येथे भरवस्तीतील श्रीराम सदाशिव गाढवे यांच्या घराजवळील शेडमध्ये शनिवारी रात्री नऊच्या सुमारास बिबट्यांनी अचानक शेळी व बोकड यांच्यावर हल्ला केला

सकाळ वृत्तसेवा

दिंडोरी : तालुक्यातील पालखेड बंधारा येथे शनिवारी( ता. २३) रात्री नऊच्या सुमारास भरवस्तीमध्ये चार बिबट्यांनी अचानक हल्ला करून बोकड्याला ठार केले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्यांनी नागरिकांची झोपच उडवली आहे. या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (residents of Palkhed disturbed by leopards Attacked 10 animals far killed Nashik News)

पालखेड बंधारा येथे भरवस्तीतील श्रीराम सदाशिव गाढवे यांच्या घराजवळील शेडमध्ये शनिवारी रात्री नऊच्या सुमारास बिबट्यांनी अचानक शेळी व बोकड यांच्यावर हल्ला केला. शेळी पळून जाण्यास यशस्वी झाली.

मात्र, बिबट्यांनी बोकड्याला ठार केले. श्री. गाढवे यांनी आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी धाव घेतली. यामुळे बिबट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन घरांवर झेप घेत पळून गेले. वस्तीत चार बिबटे आल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

सध्या तालुक्यातील पालखेड, कोऱ्हाटे परिसरात बिबट्यांनी कहरच केला असून, दोन दिवसांपूर्वी कोऱ्हाटे येथे विलास कदम या तरुणावर हल्ला करून त्याला जखमी केले.

त्याआधी बिबट्यांनी श्री. सोळशे यांच्या ६ शेळ्या, मंगेश गोतरणे यांच्या तीन शेळ्या आणि आता गाढवे यांचा एक बोकड, अशा एकूण दहा जनावरांना फस्त केले आहे.

यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वन विभागाने पंचनामे केले आहेत. मात्र, नुकसानग्रस्तांना मदत कधी मिळणार व बिबट्यांचा बंदोबस्त कधी होणार, हे मात्र सांगणे कठीण झाले आहे.

कित्येक दिवसांपासून बिबट्यांनी परिसरात दहशत निर्माण केली आहे. तरीही बिबट्यांचा बंदोबस्त होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. या परिसरामध्ये पिंजरेही लावले आहेत.

मात्र, अजूनही बिबटे पिंजऱ्यात अडकत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वन विभागाने पिंजऱ्यांची संख्या वाढवून बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी पालखेड बंधारा व कोऱ्हाटे येथील नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT