Vehicles parked on grounds esakal
नाशिक

Nashik News: पवननगर मैदानावरील अनधिकृत वाहनतळामुळे रहिवासी त्रस्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पवननगर मैदान अनधिकृत वाहनतळ बनत चालले असून, महापालिका प्रशासनाची याकडे डोळेझाक झाल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. पवननगर मैदानावर रहिवाशांसाठी जॉगिंग ट्रॅक उपलब्ध आहे.

सकाळी शेकडो रहिवासी जॉगिंगसाठी येतात. ग्रीन जिममध्ये व्यायामही करतात. लहान मुले मैदानी खेळ खेळतात. परंतु अनधिकृत वाहनतळामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो. (Residents suffer due to unauthorized parking at Pawannagar Maidan Nashik News)

खेळताना चुकून एखाद्या वाहनाचे नुकसान झाल्यास लहान- मोठे भांडणे होत असल्याने रहिवासी त्यांच्या मुलांना खेळण्यास मज्जाव करतात.

दुपारी येथे प्रेमियुगुल व गावागुंडांचा वावरही असतो. मद्यपी व गर्दूल्ले हेदेखील राजरोस ठाण मांडून बसलेले असतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अशांवर पोलिस प्रशासनाने कठोर कार्यवाही करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यांना प्रतिकार केल्यास दादागिरी करून शिवीगाळ करण्याचे प्रकार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे.

"पवननगर मैदानाचा वापर स्थानिकांना कमी तर गाड्या पार्किंग, गर्दूल्ले, प्रेमियुगुल यांना जास्त होत आहे. याचा रहिवाशांना जास्त त्रास होत असून या गंभीर बाबीवर मनपा प्रशासन व पोलिस प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी."- संदीप महाजन, स्थानिक रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 : पाकिस्तानी वंशांच्या क्रिकेटपटूला T20 World Cup साठी भारताने व्हिसा नाकारला; सोशल मीडियावर लिहितो की...

Belly Fat Reduction: पोटाची चरबी कमी करायची आहे? हार्वर्ड डॉक्टरांकडून जाणून घ्या डाएटचं बेस्ट फॉर्मुला

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीर: दहशतवादी संबंधांच्या आरोपाखाली 5 सरकारी कर्मचारी निलंबित

Pandharpur Politics : 'आमदार आवताडेंनी पंढरपुरात भाजपचे सहा उमेदवार पाडले'; पराभूत महिला उमेदवाराच्या पतीचा गंभीर आरोप, अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Shiv Thakare: अखेर त्या अफवा खोट्या ठरल्या; शिव ठाकरेने सांगितलं 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य

SCROLL FOR NEXT