electricity News esakal
नाशिक

Nashik : वीज कंपनीला अखेर 'तो' बिघाड सापडला

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर (जि. नाशिक) : ‘सदिच्छानगरमध्ये वीज कंपनीला ३६ तासानंतरही सापडेना बिघाड’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर गुरुवारी (ता. १५) वीज कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी ॲक्शन मोडमध्ये आले. युद्धपातळीवर प्रक्रिया राबवून हा बिघाड शोधण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. (Restoration of power supply to Sadichha Nagar Nashik Latest Marathi News)

दरम्यान, येथील केबलमधील बिघाड सापडला असला तरी त्याच केबलमध्ये पुन्हा पंक्चर असल्याने ही संपूर्ण केबल बदलायची की झालेला बिघाड दुरुस्त करायचा याचा निर्णय शुक्रवारी (ता. १६ ) घेण्यात येणार आहे. या भागात मोठ्या इमारतीत ऐवजी छोटे घरे आहेत. त्यामुळे रस्त्याच्या खालून अनेक छोट्या वायर गेल्या आहेत.

खोदकाम करताना त्या तुटण्याची शक्यता असल्याने सर्व खबरदारी घेऊन ही दुरुस्ती पूर्ण केली जाणार असल्याचे सहाय्यक अभियंता संतोष धारराव यांनी सांगितले. दरम्यान, येथील वीजपुरवठा सुरळीत झाला असून, शुक्रवारी पूर्णता या बिघाडावर उपाययोजना केली जाणार आहे. वीजपुरवठा सुरळीत झाल्याने स्थानिक नागरिकांनी ‘सकाळ’ चे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT