nashik lockdown released esakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यात निर्बंध होणार आणखी शिथील

विनोद बेदरकर

नाशिक : राज्य शासनाने लॉकडाउन निर्बंध शिथील करण्यासाठी ठरविलेल्या निकषानुसार नाशिक जिल्ह्यात कोरोना संर्सगाचा दर (पॉझीटीव्हीटी रेट) आठवड्यापासून झपाट्याने घरसतो आहे. तब्बल अडीच टक्क्याने हा दर घसरल्याने नाशिकमधील लॉकडाउन निर्बंध शिथील होण्याची शक्यता वाढली आहे. (Restrictions-released-in-Nashik-district-marathi-news)

पॉझीटीव्हीटी रेट घटला

राज्यात १४ जिल्हे रेड झोन मध्ये असल्याने १ जूनपासून लॉकडाउन शिथील होउ शकले नाही. त्यात वाढ झाली. मात्र हे निर्बंध शिथील करण्यासाठी राज्य शासनाने विविध पाच वर्गवारी निश्चित केल्या आहे. त्यानुसार जिल्हा आणि महापालिकांचे स्वतंत्र वर्गीकरण करुन त्यांचे मूल्यमापन सुरु केले आहे. कोरोना बाधीत रुग्णांच्या आठवडाभरातील संर्सग दर (पॉझीटीव्हीटी रेट) आणि आॅक्सीजन बेडची उपलब्धता या निकषानुसार शहराचे वर्गीकरण केले जाणार आहे. शासनाने अधिसूचनेनुसार राज्यभर हे मूल्यांकन सुरु केले आहे. सप्ताहाचा विचार करता, गेल्या चार दिवसात नाशिकचा संसर्ग दर ९.२२ हून ८.७६ आणि ७. २५ पर्यत कमी झाला आहे. यात दोन दिवसात त्यात आणखी घट अपेक्षित आहे. याच गतीने नाशिक शहर आणि जिल्ह्यातील कोरोना संर्सगाचे प्रमाण घटत राहिल्यास नाशिक जिल्हा ५ टक्के संर्सग दराच्या आत येण्याची शक्यता आहे. मृत्यू दराचा अपवाद सोडला तर कोरोना बाधीतांच्या संर्सग दरात आणि आॅक्सीजन बेडच्या संख्येत सातत्याने घट सुरु आहे. त्यामुळेच नाशिकमधील लॉकडाउनचे निर्बंध शिथील होण्याची शक्यता वाढली आहे.

आठवडाभरात संर्सग दरात (पॉझीटीव्हीटी रेट) अडीच टक्के घट

शासनाने जिल्हा व महापालिकांसाठी पाच लेवल्स निश्चित केल्या आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट व वापरात असलेले ऑक्सिजन बेडचे प्रमाण विचारात घेऊन कोणते शहर कोणत्या लेवलमध्ये बसते ते निश्चित करायचे आहे. त्यासाठी निश्चित केलेले नियम लागू होतील. स्थानिक परिस्थिती पाहून अंशतः फेरबदल करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आहेत. महापालिका व जिल्हा अशी पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेड वापराचे माहिती संकलित सुरू केले आहे. - सूरज मांढरे (जिल्हाधिकारी नाशिक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT